Share

मोठी बातमी: अखेर विराटनंतर होणाऱ्या कॅप्टनचे नाव ठरले! मात्र खेळाडूसमोर आहे ‘ही’ अट 

भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराटने नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटच्या अचानक राजीनाम्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (BCCI) या पदावर कोणत्या खेळाडूला नेमायचा हा मोठा प्रश्न आहे. त्याचवेळी बीसीसीआयने नव्या कॅप्टनचे नाव निश्चित केले आहे.

भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. रोहित सध्या वन-डे आणि टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन आहे. दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाता आलेलं नाही. त्यामुळे केएल राहुल आगामी वन-डे मालिकेत कॅप्टनसी करणार आहे.

याचबरोबर बीसीसीआच्या अधिकाऱ्यानं रोहित शर्माला कॅप्टन होण्यासाठी एका अटीचे पालन करावे लागेल असंही स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवडकर्ते रोहित शर्माशी वर्कलोड आणि फिटनेसशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘कामाचा ताण जास्त आहे. रोहित शर्माला स्वतःला तंदुरुस्त ठेवावे लागेल. मला वाटते की निवडकर्ते त्याच्याशी बोलतील आणि त्याला फिटनेसवर अतिरिक्त काम करावे लागेल.

दरम्यान, रोहित शर्मा जर कर्णधार झाला तर उपकर्णधार कोण असेल या मुद्द्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एक मोठी गोष्ट सांगितली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘उपकर्णधार हा टीम इंडियाचा पुढचा लीडर असेल. केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह हे सर्व भावी लीडर आहेत.

टी20 आणि एकदिवसीय कर्णधारपदआधीच सोडलेल्या विराटने आता कसोटी कर्णधारपदही सोडल्याने विराटच्या चाहत्यांसह सर्वच भारतीयांना धक्का बसला. भारताचा मर्यादीत षटकांचा कर्णधार रोहित शर्मानेही एक इन्स्टाग्राम पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहितने इन्स्टा पोस्टमध्ये विराट आणि त्याचा कसोटी सामना खेळतानाचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, ‘हे धक्कादायक आहे. पण भारतीय कसोटी संघाचा कर्णधारपद उत्तम रित्या सांभाळल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!’

महत्त्वाच्या बातम्या
मी किरण मानेंसोबत काम केलय, त्यांनी कधीही महीलांसोबत गैरवर्तन केले नाही; अभिनेत्री अनिता दाते मानेंच्या समर्थनासाठी मैदानात
प्रार्थना बेहरेची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली, आय लव्ह यू, माझ्या हॅंडसम पतीला…
अपूर्वा-शशांकच्या लग्नात आदर्श शिंदे आणि वैशाली सामंतने लावले ठुमके; पहा भन्नाट डान्स व्हिडीओ
“भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन, मी एका दिवसात ४ लाखाचे ५४ लाख केलेला माणूस”

 

आंतरराष्ट्रीय खेळ

Join WhatsApp

Join Now