आयपीएलमुळे अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. आयपीएलमध्ये अनेक जणांना संधी मिळून त्यांनी त्याचं आयुष्य अधिक सुखाचे आणि संपत्तीचे बनवले आहे, अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. अशातच चाहत्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या मालमत्तेची तुलना करत चर्चा रंगली आहे.
आम्ही तुम्हाला संघाच्या कर्णधारांच्या मालमत्तेची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे आता येणाऱ्या आयपीएलच्या हंगामात 10 कर्णधार भरपूर कमावणार आहेत. तसेत त्यांचं नेटवर्थही शानदार आहे. मात्र सध्या कोणत्या कर्णधाराची किती कमाई आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आरसीबी संघाच्या कर्णधाराबद्दल बोलायचे झाल्यास, विराटनंतर या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी फॅफ डु प्लेसिस स्वीकारणार आहे. फॅफला आरसीबीकडून 7 तर आफ्रिका बोर्डाकडून 3 कोटी मिळतात. त्याची वार्षिक कमाई ही 102 कोटी रुपये इतकी आहे.
लखनऊ या नव्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी केएल राहुलला मिळाली आहे. तो क्रिकेट बरोबरच अनेक जाहिराती देखील करत असतो. बीसीसीआयच्या वार्षिक कंत्राटानुसार त्याला 5 कोटी रुपये मिळतात. त्याला जाहिराती आणि इतर मार्गातून मिळणाऱ्या कमाईचा आकडा जवळपास 75 कोटी इतका आहे.
तर राजस्थान रॉयल्सच्या टीमची जबाबदारी ही संजू सॅमसनकडे आहे. संजू सॅमसनला या आयपीएलमध्ये 14 कोटी रुपये मिळत आहेत. संजूची नेट वर्थ 52 कोटी इतकी आहे. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये नव्याने आलेल्या गुजरात टायटन्स टीमची धुरा हार्दिक पंड्याला देण्यात आली आहे. हार्दिकची नेट वर्थ 37 कोटी इतकी आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी ही महेंद्रसिंह धोनीवर आहे. धोनी देखील अनेक जाहिराती करताना दिसतो. येणाऱ्या आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी त्याला 12 कोटी रुपये मिळणार आहेत. माहितीनुसार धोनीची कमाई ही 800 कोटी रुपये एवढी आहे.
तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएल मधील सर्वांत यशस्वी कर्णधार म्ह्णून ओळखला जातो. रोहित हा बीसीसीआयच्या ए प्लस वर्गवारीतील खेळाडू आहे. त्यामुळे रोहितला बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. येणाऱ्या आयपीएल हंगामासाठी त्याला मुंबई कडून 16 कोटी रुपये देण्यात आले आहेत. माहितीनुसार त्याची कमाई 180 कोटी रुपये इतकी आहे.
पंजाब किंग्जने 12 कोटी रुपये मोजून मयंक अग्रवालला रिटेन केलं. मयंकची एकूण संपत्ती 26 कोटींच्या जवळपास आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला या आयपीएलच्या हंगामातून 16 कोटी रुपये मिळत आहेत. माहितीनुसार पंतची एकूण नेट वर्थ 36 कोटी इतकी आहे.






