Share

Rohit Sharma : झिम्ब्बाब्वेविरुद्धही लवकर बाद झाल्यामुळे रोहित ट्रोल; संतप्त चाहते म्हणाले, थोडी तरी लाज वाटू दे…

rohit sharma

rohit sharma troll after lose wicket  | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म २०२२ च्या टी२० वर्ल्डकपमध्येही कायम आहे. आज म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी भारत सुपर १२ चा झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा सामना खेळत आहे. जिथे टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अशात चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असताना कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही, त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला २०२२ चा टी-२० वर्ल्डकपमध्ये एकाही सामन्यात मोठी खेळी खेळता आली नाही.

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या हिटमॅनला आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये केवळ नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावता आले आहे, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेटही चर्चेचा विषय होता. त्यामुळे संघातील इतर खेळाडूंमुळे भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहचला आल्याचे म्हटले जात आहे.

या स्पर्धेत रोहित शर्माची आकडेवारी पाहता त्याने ४ (पाकिस्तान), ५३ (नेदरलँड्स), १५ (दक्षिण आफ्रिका), २ (बांगलादेश), १५ (झिम्बाब्वे) धावा केल्या आहेत. वरच्या फळीतील त्याच्या फ्लॉपमुळे संपूर्ण संघावर दबावाची परिस्थिती निर्माण होत आहे.

अशा परिस्थितीत झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध त्याची बॅटही चालली नाही, तेव्हा सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रोहित असाच खेळत राहिला तर भारताला विश्वचषक गमवावा लागू शकतो, असे लोकांचे मत आहे.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एकाने म्हटले आहे की हा शर्माजी पण म्हणत असतील हा आमचा मुलगा नाहीये. तर एकाने म्हटले आहे की, बाबरशी हात नाही मिळवला का? तर एकाने म्हटले आहे की थोडीरी लाज वाटू दे भावा. अशा प्रकारच्या कमेंट्स करत लोकांनी रोहितला ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये
Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक
Eknath Shinde : शरद पवारांसोबतच्या भेटीत काय झालं? राष्ट्रवादीने लपवलेलं ‘ते’ गुपित शिंदेंनी हसत हसत फोडलं

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now