भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे. यावर भारताचा मर्यादीत षटकांचा कर्णधार रोहित शर्मानेही एक इन्स्टाग्राम पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितने इन्स्टा पोस्टमध्ये विराट आणि त्याचा कसोटी सामना खेळतानाचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, ‘हे धक्कादायक आहे. पण भारतीय कसोटी संघाचा कर्णधारपद उत्तम रित्या सांभाळल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!’ तसेच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं विराटच्या या निर्णयावर मोठं विधान केलं आहे.
कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो, वेळ आल्यावर ती जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवावी लागते, असे गंभीर म्हणाला. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात गंभीर म्हणाला, ”कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो.
तसेच महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूनंही कर्णधारपदाची बॅटन विराट कोहलीकडे सुपूर्द केली होती. तोही कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. धोनीनं तर तीन आयसीसी स्पर्धा आणि चार आयपीएल ट्रॉफी उंचावल्या आहेत. त्यामुळे आता कोहलीनं धावा बनवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. ते जास्त महत्त्वाचे आहे,’ असे गंभीर म्हणाला आहे.
दरम्यान, विराटच्या या निर्णयानंतर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने एक भावनिक पत्र लिहिले आहे.त्यात तिनं विराटच्या या प्रवासाची माहिती दिली आहे. ती म्हणते,” २०१४ची गोष्ट आजही मला आठवतेय. महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि तू मला सांगितलेस की मी कसोटी संघाचा कर्णधार बनणार आहे. दुसऱ्याच दिवशी तू, MS आणि मी गप्पा मारत होतो आणि तेव्हा तुझ्या दाढीचे केस आतापासूनच राखाडी होत असल्याचे गमतीनं MS म्हणाला. आपण सर्व तेव्हा भरपूर हसलो होतो.
त्यादिवसापासून तुझ्या दाढीचे केस राखाडी होताना मी पाहतेय. मी तुझ्यातली वाढ पाहिली आहे, अफाट वाढ. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो भारताच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून तुझ्या वाढीचा आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघानं मिळवलेल्या यशाचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु, त्याहीपेक्षा तुझ्यात अंतरंगात झालेल्या वाढीचा मला अधिक अभिमान आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी: अखेर विराटनंतर होणाऱ्या कॅप्टनचे नाव ठरले! मात्र खेळाडूसमोर आहे ‘ही’ अट
राष्ट्रवादीचा घोर अपमान! लढवण्यासाठी दिलेली एकमेव जागाही अखिलेश यादवांनी परत घेतली
पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेणाऱ्या विकीला एकेकाळी सराव करणेही झाले होते अवघड
पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेणाऱ्या विकीला एकेकाळी सराव करणेही झाले होते अवघड