भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माची कारकीर्द त्याच्या वैयक्तिक आयुष्याइतकीच उजळ आहे. रोहित शर्माचे मुंबईतील वरळी येथे अतिशय आलिशान अपार्टमेंट आहे.(rohit-sharma-owns-assetss-worth-crores)
रोहितचे घर वरळीतील आहुजा अपार्टमेंटच्या(Ahuja Apartment) 29व्या मजल्यावर आहे. रोहित शर्माचा हा अपार्टमेंट 6,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधला आहे. रोहित शर्माच्या घरात सर्व सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू आहेत. रोहित शर्माच्या घरात 4 किंग साइज बेडरूम, हॉल आणि किचन आहे.
रोहित शर्माने हे घर 2015 मध्ये त्याच्या एंगेजमेंटनंतर 30 कोटींना विकत घेतले होते.रोहित शर्माच्या घराच्या बाल्कनीतून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. या घराच्या नेम प्लेटवर रोहित शर्मासह त्याची पत्नी रितिका आणि मुलगी अदाराचे नावही लिहिले आहे.
रोहित आणि रितिका यांचे घर खूप आलिशान आहे. रोहित शर्माच्या घरातील खोल्यांमध्ये सुंदर झुंबर आहेत. खोल्यांच्या काचेच्या खिडक्यांमधून संपूर्ण समुद्र दिसतो. आहुजा अपार्टमेंट्सच्या लक्झरी सुविधांमध्ये क्लब हाऊस आणि मनोरंजन क्षेत्र यांचा समावेश आहे. याशिवाय स्पा, जकूझी, मिनी थिएटर, योगा रूम, सिगार रूम, वाईन सेलर आणि बिझनेस एरिया आहे.