रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन एकदिवसीय सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. 10 जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी जिंकल्यानंतर यजमानांनी 12 जानेवारीला दुसरा सामना 4 गडी राखून जिंकला.
चला तर मग जाणून घेऊया या शानदार विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचे काय म्हणणे आहे. खरं तर, श्रीलंकेविरुद्धची दुसरी वनडे संपल्यानंतर, जेव्हा हर्षा भोगलेने भारतीय कर्णधार रोहित शर्माला विचारले की तुम्हाला टॉप ऑर्डरमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजाची गरज आहे का, तेव्हा त्याने मजेदार उत्तर दिले.
तो म्हणाला की, “आम्हाला डाव्या हाताच्या फलंदाजाची गरज आहे पण आमचा उजव्या हाताचा फलंदाज सध्या चमकदार कामगिरी करत आहे. दबावाखाली तो परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.”
त्याचवेळी पुढे बोलताना तो म्हणाला की केएल राहुल ५व्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे आणि या क्रमांकावर अनुभवी फलंदाजाला आत्मविश्वास मिळतो. यावेळी कर्णधार रोहीत शर्माने के एल राहूलचे तोंडभरून कौतूक केले. जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला.
“हा एक लो स्कोअर सामना होता, पण यासारखे सामने तुम्हाला खूप काही शिकवतात. केएल राहूल बराच काळ पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. जेव्हा एखादा अनुभवी फलंदाज पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तेव्हा तो तुम्हाला खूप आत्मविश्वास देतो.
तिसऱ्या वनडेसाठी आम्ही खेळपट्टी पाहणार आहोत. याशिवाय पुढे आणखी एक वनडे मालिकाही येत आहे. त्यामुळे आम्हाला काही बदल करायचे आहेत का ते आम्ही पाहू. असेही कर्णधार रोहीत शर्मा पुढे म्हणाला.
विशेष म्हणजे, भारतीय संघात ऋषभ पंत हा एकमेव डावखुरा फलंदाज होता, परंतु त्याला एका रस्ता अपघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहितच्या या वक्तव्यावरून तो पंतलाही कुठेतरी मिस करत असल्याचे सूचित करत आहे.
कुलदीप यादवचे कौतुक करताना रोहित शर्मा पुढे म्हणाले की, “कुलदीप नुकताच संघात आला आणि त्याला यश मिळते, तो सध्या एक गोलंदाज म्हणून खूप खात्रीलायक आहे, हे संघासाठी चांगले लक्षण आहे.
न्यूझीलंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामनेही खेळायचे आहेत, त्यामुळे आम्हाला खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्याची गरज आहे. आमच्याकडे आता मोठा हंगाम आहे आणि आम्हाला सर्वकाही लक्षात ठेवावे लागेल. ”
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा रोहित शर्मा या सामन्यात केवळ 20 धावा करू शकला. मात्र, केएल राहुलची 64 धावांची खेळी आणि कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीमुळे संघाने 4 विकेट्सने सामना जिंकला.