Share

Rohit Sharma : बांगलादेशला १ बाॅल ७ धावा लागत असताना रोहित शर्माने केली ‘ती’ चालाखी अन् सामनाच पलटला

rohit sharma

rohit sharma on last ball against bangladesh  | टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला आहे. भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाने सेमी फायनलमधील स्थान पक्के केले आहे. हा सामना खुपच थरारक होता. पण शेवटच्या षटकात हा सामना पलटला आणि भारताने हा सामना जिंकला.

अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकत होता. १ चेंडूत ७ धावांची गरज होती. त्या चेंडूवर षटकार बसला असता तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण भारताला हा सामना जिंकायचा होता. त्यामुळे रोहितने आपला अनुभव पणाला लावला आणि एक चालाखी करत भारतीय संघाला हा सामना जिंकवून दिला.

शेवटच्या षटकात भारतीय संघाला २० धावांची गरज होती. रोहित शर्माने यावेळी मोहम्मद शमीला षटक न देता अर्शदीपला षटक दिले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच फलंदाजाने षटकार ठोकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक चौकार मारला. त्यामुळे १ चेंडूत ७ धावांची गरज होती.

शेवटचा चेंडू कसा टाकावा याचा विचार अर्शदीप करत होता. पण रोहितने विचार केला आणि त्याचाच फायदा भारतीय संघाला झाल्याचं दिसून आलं. हा सामना सुरु होता. तेव्हा मध्ये पाऊस आला होता. त्यामुळे चेंडू ओला होता. जर ओला चेंडू अर्शदीपने टाकला असता तर चेंडू त्याच्या हातातून निसटला असता. पण त्यावेळी रोहितने चेंडू हातात घेतला आणि तो पुसला. त्यामुळे त्याचा ओलावा निघून गेला.

चेंडू पुसल्यामुळे अर्शदीपच्या हातात चेंडू पुर्णपणे बसला. अर्शदीपने शेवटचा चेंडू यॉर्कर टाकला होता. पण चेंडू ओला असता तर चेंडू सुटला असता आणि तो फुलटॉस गेला असता. त्यामुळे फलंदाजाने षटकारही मारला असता. पण चेंडू बरोबर यॉर्कर गेला, त्यामुळे फलंदाजाला मोठा शॉट खेळता आला नाही. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना जिंकला.

या सामन्यात विराट आणि केएल राहूलने अर्धशतक ठोकले. तर सुर्याने आक्रमकपणे ३० धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला १८४ धावा करता आल्या. पण पावसामुळे हे लक्ष्य १६ षटकात १५१ करण्यात आले. पण बांगलादेशला १४५ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला आहे.

महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपची घातक गोलंदाजी पाहून चाहते हैराण, म्हणाले, भारत सरकारला विनंती आहे की..
T-20 World Cup : भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानचा रडीचा डाव; समीकरण बदलणार?
uddhav thackeray : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट ठरली

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now