rohit sharma leave captaincy | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर पूर्णपणे निराश झाला आहे. इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सने पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येताना स्पष्ट दिसत होते. या सगळ्यामध्ये रोहित शर्माशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.
रोहित लवकरच त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा करू शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. यावेळी ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा टीम इंडिया देखील होता, पण सेमीफायनल मॅचमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.
टीम इंडियाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की रोहित शर्मा टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करू शकतो. रोहित शर्माने गेल्या वर्षभरापासून टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळले आहे, पण तो त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही.
२०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आशिया चषक २०२२ मध्येही पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेतही टीम इंडियाला अंतिम फेरी गाठता आली नाही. रोहित शर्माने आतापर्यंत २ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असून हे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. त्याने १६ वनडेमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे, त्यापैकी १३ जिंकल्या आणि ३ सामान्यांमध्ये भारताला पराभव स्वीकाराव लागला आहे.
टी २० फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर, एकूण ५१ टी २० सामन्यांमध्ये कर्णधार असताना रोहित शर्माने ३९ सामने जिंकले आहेत आणि १२ गमावले आहेत. टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्यावर अष्टपैलू हार्दिक पांड्याला भारताचा टी २० कर्णधार बनवण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दोन्ही देश तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील.
महत्वाच्या बातम्या-
Rahul Dravid : भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्येही खेळण्याची परवानगी दिली पाहीजे; पराभवानंतर द्रविडची मागणी
Cricket: घरात एकच बाप असावा, सात सात बाप असतील तर..; जडेजाची टिका रोहीत शर्माला झोंबणार
शामी-भुवीच्या निष्काळजीपणावर संतापला रोहित; चालू मॅचमध्येच झाप झाप झापले, व्हिडीओ व्हायरल






