Share

मुंबई इंडीयन्सच्या अपयशाला रोहीत शर्माच जबाबदार; ‘ह्या’ निर्णयांचा बसला मोठा फटका

आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्स सलग सात वेळा मालिका हरणारा पहिला संघ बनला आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यामध्ये देखील चेन्नई सुपर किंगने मुंबईचा दारुण पराभव केला आहे. कालच्या सामन्यात चेन्नई तीन विकटने जिंकली आहे. सध्या मुंबईच्या पराभवाला जबाबदार कोण असेल तर सर्वात पहिले कॅप्टन रोहित शर्माचे नाव घेण्यात येत आहे.

यावेळेसच्या आयपीएल सामन्यात रोहित शर्माची सर्वात खराब कामगिरी बघायला मिळत आहे. यंदाच्या सामन्यात एक फलंदाज म्हणून रोहित सलग सहाव्यांदा अपयशी ठरला आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात रोहितने 41 धावा काढल्या होत्या. त्यानंतर तो एकदाही 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही.

रोहित शर्माचे कर्णधारपदही चेन्नईविरुद्ध खूपच कमकुवत ठरले आहे. 2019 च्या आयपीएल सामन्यात धोनीने जयदेव उनादकटच्या गोलंदाजीला खूप नावे ठेवली होती. असे असतानाही रोहितने शेवटच्या षटकात उनाडकटला धोनीसमोर उभे केले. त्यामुळे पुन्हा उनादकटची मान शरमेने खाली झुकली.

मुख्य म्हणजे, फलंदाजीचे सामूहिक अपयशही मुंबईच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. या सामन्यात टिळक वर्माने (51) स्वतःच्या बाजूने संघाला जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सोडून इतर एकाही फलंदाजाला 32 धावांच्या पुढे जाता आले नाही. रोहितशिवाय इशान किशनलाही या सामन्यात आपले खाते उघडता आले नाही.

तसेच डेवाल्ड ब्रेव्हिस 4 आणि किरॉन पोलार्ड केवळ 14 धावाच करू शकले. दरम्यान मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या 4 चेंडूत चेन्नईला 16 धावांची गरज होती. धोनीने आधी षटकार आणि नंतर चौकार मारला. यानंतर धोनीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा आणि एक चौकार मारून सीएसकेला मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बाातम्या
शिवसेनेच्या वाटेला गेलात तर वाघाची नखं अजूनही धारधार आहेत हे लक्षात ठेवा; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला इशारा
औरंगजेबासारख्या जुलमी लोकांनी आमची मुंडकी कापली पण तरीही आम्ही आमचा धर्म सोडला नाही
‘राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय’
मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान सापडले हिंदू मंदिरासारखे अवशेष, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी केलं ‘हे’ आवाहन

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now