Share

रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला दिली होती धमकी, म्हणाला होता, ‘मॅच जिंकलो की मग याला बघतो’

2020- 2021 मध्ये झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टेस्ट मॅच सगळ्यांच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मॅच जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला होता. नुकत्याच या सामन्यावर एक डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे. यावर अजिंक्य रहाणे याने एका मुलाखतीदरम्यान काही खुलासे केले आहेत.

गाबामध्ये झालेल्या या सामन्यात शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका पार पडली होती. परंतु त्याच्यावर रोहित शर्मा कमालीचा संतापला होता. ‘हा सामना संपू दे, मग मी याला चांगला धडा शिकवतो’ असे रोहित रागाच्या भरात बोलला असल्याचा खुलासा रहाणे याने केला आहे.

या मुलाखतीदरम्यान रोहित शर्माच्या रागाचे कारण रहाणेनी सांगितले आहे. शार्दुलने टेस्ट सिरीजच्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार अर्धाशतक  झळकवले होते. त्याने शेवटच्या सामन्यात 67 धावांची आक्रमक खेळी केली होती. भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावांची गरज होती. परंतु चौकार मारायच्या नादात तो आउट झाला.

पुढे तो म्हणाला की, ‘रोहितने शार्दुलला मैदानात जाण्यापूर्वी कानमंत्र दिला होता. 10 धावांची गरज असताना शार्दुलने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो झेलबाद झाला. शार्दुलच्या या खराब शॉटवर रोहित चांगला संतापला होता. त्याचा राग शांत करत त्याची मी समजूत काढली असल्याचे रहाणेनी सांगितले आहे.

दरम्यान शार्दुलच्या खराब शॉटमुळे भारतीय संघावर कोणताच परिणाम झाला नाही. कारण पुढच्या बॉलवर ऋषभ पंतने चौकार मारला. त्यामुळे भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली होती. हा सामना अजूनही क्रिकेट प्रेमीना रोमांचित करतो. नुकतेच या सामन्यावर एक डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे.

‘बंदो में था दम’ असे या डॉक्युमेंट्रीचे नाव असून ज्या खेळाडूंमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला त्यांची या निमित्ताने मुलखत घेण्यात आली. त्यावेळी या सामन्यादरम्यानचे काही किस्से रहाणेनी मुलाखतीत सांगितले आहेत. हे किस्से सांगत असताना तो गहिवरला होता.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now