Share

“त्याच लग्न झालं आहे, आमच्याबद्दल बोलणं बंद करा”, रोहितच्या एक्स गर्लफ्रेंडचे चाहत्यांना आवाहन

बिग बॉसची माजी स्पर्धक सोफिया हयात सध्या चर्चेत आली आहे. सोफिया हयात हीने एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आपला बॉयफ्रेंड असल्याचा दावा केला होता. आता सोफिया हयात हीने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सोफिया हयात हीने लोकांना एक आवाहन केलं आहे.(Rohit sharma ex-girlfriend appeals to fans)

“रोहित शर्मा आणि माझ्याबद्दल बोलणं बंद करा”, असे सोफिया हयात हीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. २०१२ मध्ये सोफिया हयात आणि रोहित शर्मा यांच्यात अफेअर असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर सोफिया हयात चर्चेत आली होती. “मी रोहितला डेट केले होते पण आता आमच्याती सर्व काही संपले आहे”, असा खुलासा सोफियाने सोशल मीडियावर होता.

३८ वर्षीय सोफिया हयात हीने आता एक व्हिडिओ जारी केला आहे. सोफिया हयात हीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. “रोहित शर्मा आणि माझ्याबद्दल बोलणं बंद करा. रोहित शर्मा आणि मी एकत्र राहावं असं अजूनही काही लोकांना वाटत आहे. मला हे पटत नाही आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझं आणि रोहितचं नाव ट्रेंड होत आहे. ”

https://twitter.com/sofiahayat/status/1540732294058504193?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1540732294058504193%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fsport%2Frohit-sharma-ex-girlfriend-sofia-hayat-shared-video-and-appeal-fans-to-not-take-names-mhsd-723291.html

“रोहितचं आता लग्न झालं आहे. त्याला एक मुलगी देखील आहे. याचा आपण आदर करू शकतो का? त्याच्या लग्नाचा सन्मान करा”, असे सोफिया हयात हीने व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. सोफिया हयात हीने व्हिडिओमध्ये पुढे म्हंटले आहे की, “लंडनच्या एका हॉटेलमध्ये रोहितची आणि माझी भेट झाली होती. त्यावेळी या क्रिकेटरने मला किस केले होते.”

“रोहितने माझ्यासोबत डान्स देखील केला होता. पण रोहितने त्याच्या मित्रांसमोर माझी ओळख फॅन अशी करून दिली होती. त्यावेळी मला खूप दुःख झाले. मी आता रोहितला विसरले आहे. तो कसा दिसत होता ते देखील मला आठवत नाही. पण आमच्या चाहत्यांनी आम्हाला पुन्हा ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे.आता आमच्यात सर्व काही संपले आहे. आम्ही आपापल्या आयुष्यामध्ये आनंदी आहोत.”

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा होणार आहे. यासाठी सर्व भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. रोहित शर्मा देखील इंग्लंडमध्ये आहे. रोहित शर्माला नुकतीच कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे रोहित शर्मा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
”बाळासाहेब जिवंत असते तर आज सोनिया आणि शरद पवार महाराष्ट्रावर राज्य करत नसते”
आमदार निधीतून मलिदा खाणारे बायकोला साधं लुगडं घेऊ शकत नाहीत..; शहाजी पाटलांची पोलखोल
..जेव्हा रेमोला ICU मध्ये पाहून वरूण धवनच्या अंगावर आला होता काटा, डोळ्यात आलं होतं पाणी

ताज्या बातम्या खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now