Share

Virat Kohli: संपुर्ण सामन्यात रोहित शर्माने विराटला स्वत:जवळ फिरकूही दिले नाही, ‘हे’ होते त्यामागचे कारण

Virat Kohli, Asia Cup, Rohit Sharma/ भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि नंतर झिम्बाब्वेमध्ये विश्रांती देण्यात आली होती. आशिया चषक UAE मध्ये खेळला जात आहे आणि पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) झाला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथे फलंदाजीबद्दल नाही तर भारताच्या क्षेत्ररक्षणाच्या वेळेबद्दल बोलत आहे. संपूर्ण पाकिस्तानी डावात विराट कोहलीला रोहित शर्माच्या आसपासही पाहिले नाही. कारण होते विराट कोहलीची ताकद आणि फिटनेस.

कर्णधार रोहितने विराट कोहलीचा पुरेपूर फायदा उठवला, ज्याची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. कर्णधार असल्याने तो स्वत: 30 यार्डच्या वर्तुळात क्षेत्ररक्षण करत होता, मात्र विराटला सतत सीमारेषेवर ठेवलं. याचा फायदा संघालाही झाला आणि विराटने अनेक प्रसंगी शानदार क्षेत्ररक्षण करताना धावा वाचवल्या.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेवर केएल राहुलच्या रूपाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. राहुल बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या विराटला पहिल्याच षटकात जीवदान मिळाले. यानंतर त्याने अनेक आकर्षक शॉट्स खेळले. त्याने भारतासाठी 35 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

विराटच्या खेळीत 3 चौकार आणि एका षटकाराचाही समावेश होता. खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड होते आणि विराट सुरुवातीला संघर्ष करताना दिसत होता. त्याच्या बॅटवर चेंडू येत नव्हता. यानंतरही त्याने हार न मानता धावा सुरूच ठेवल्या. रोहित शर्माने 18 चेंडूत 12 धावा केल्या. दोघांना डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने बाद केले.

त्याचा खराब फॉर्म केवळ चाहत्यांसाठीच नाही तर किंग कोहलीसाठीही चिंतेची बाब आहे. फॉर्म परत येण्यासाठी कोहलीने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली होती. तो भारतीय संघासोबत झिम्बाबे आणि वेस्ट इंडिज दौर्‍यावर गेला नव्हता. विराट पूर्वीसारखा फॉर्ममध्ये कधी येईल याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘माझी ताकद काय, मला माहिती आहे’; पाकिस्तानला हरवल्यानंतर हार्दिक पांड्याने सांगितली रणनीती
Virat kohli: शेवटच्या सामन्यावेळी स्टोक्स भावूक; विराटबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाला, तो तर..

क्रिकेटमधून ब्रेक मिळताच अनुष्काला घेऊन पॅरिसमध्ये पोहोचला विराट, पण आहे ‘ही’ अडचण

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now