भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला. इंग्लंडने दिलेल्या १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने ५८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या. या ५ षटकारांसह त्याने वनडे क्रिकेटमधील २५० षटकारही पूर्ण केले.
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्मा, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी, वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या याच्यापेक्षा पुढे आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज:
शाहिद आफ्रिदी – ३५१
ख्रिस गेल – ३३१
सनथ जयसूर्या – २७०
रोहित शर्मा – २५०*
एमएस धोनी – २२९
स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला १० विकेट्सने पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचा या विजयाचा हिरो होता जसप्रीत बुमराह, ज्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि ७.२ षटकात १९ धावा देत ६ बळी घेतले. बुमराहच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने यजमानांना ११० धावांत गुंडाळण्यात यश मिळविले.
भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील ही इंग्लंडची सर्वात कमी धावसंख्या आहे. १११ धावांचे लक्ष्य रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने १८.४ षटकात विकेट न गमावता पूर्ण केले. रोहितशिवाय धवनने ३१ धावा केल्या. उत्कृष्ट कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना १४ जुलै रोजी क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने घातला धुमाकूळ, विराटचाही विक्रम मोडत या खास यादीत मिळवले स्थान
IPL गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला रोहित शर्माने दिली संधी, पहिल्यांदाच दिसणार भारतीय संघात
विक्रमांचा धुमाकूळ! दीपक हुड्डा, ईशान किशनने केला मोठा विक्रम; रोहित शर्मा, गौतम गंभीरलाही टाकले मागे
रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर कोण उचलणार संघाची जबाबदारी? प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा