rohit sharma 2019 viral tweet | बुधवारी भारतीय संघाविरुद्ध बांगलादेश असा सामना झाला होता. या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा ५ धावांनी पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका गमावली आहे. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे आता तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.
दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा उशीरा मैदानावर आला होता. पण त्याने दुखापत झालेली असतानाही केलेली खेळी हे सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. अंगठ्यातून रक्त येत असतानानी त्याने २८ चेंडूत ५१ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण ५ धावांनी भारताने तो सामना गमावला.
आता वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर रोहितच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहितचे ते २०१९ चे आहे. पण आता ते खुपच व्हायरल होत आहे. २०१९ मधील ट्विट आता का व्हायरल होत आहे? असा प्रश्न पडला असेल तर त्यामागचे कारणही खुप खास आहे.
दुसऱ्या वनडेत रोहितला दुखापत झाली होती. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण संघ हरताना बघून तो आठव्या क्रमांकाला फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्याने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकही ठोकले. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
त्यानंतर अशी माहिती समोर आली की रोहित शर्मा दुखापतीमुळे तिसरा वनडे सामना खेळणार नाही. रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिका खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, पण तो तिसरा वनडे सामना खेळणार नाही. पण दुखापत झालेली असतानाही त्याने दुसऱ्या वनडेत त्याने जी कामगिरी केली आहे. त्यामुळे ते ट्विट व्हायरल झाले आहे.
मी फक्त संघासाठी मैदानात उतरत नाही, तर मी माझ्या देशासाठी सुद्धा मैदानात उतरतो, असे ट्विट रोहित शर्माने २०१९ मध्ये केले होते. ते ट्विट व्हायरल होत आहे. कारण त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तही निघत होते. पण तो देशासाठी मैदानात उतरला होता हे त्याने सिद्ध केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
udayanraje Bhosle : राज्यपालांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे उदयनराजेंनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले, आता भाजप…
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली – चंद्रकांत पाटील
payal : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरूणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण पुढे..