विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करत, भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मंगळवारी सांगितले की त्याच्याबद्दलच्या चर्चा थांबल्यास सर्व काही ठीक होईल. बुधवारपासून येथे सुरू होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी, रोहितला कोहलीच्या मोठ्या धावसंख्येबाबत अपयशी ठरल्याबद्दल विचारण्यात आलं.(Rohit responds to media reports on Virat’s form)
त्यावेळी रोहित म्हणाला, मला वाटते की याची सुरुवात तुमच्यापासून होते. लोकांसोबतच होते. जर आपल्या बाजूने गोष्टी बंद केल्या तर बाकी सर्व गोष्टींची काळजी घेतली जाऊ शकते. रोहित म्हणाला की, कोहली कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नाही आणि तो लवकरच मोठी खेळी खेळेल.
कोहलीच्या फॉर्मबद्दल विचारले असता, रोहित म्हणाला, तो खूप चांगल्या स्थितीत आहे आणि एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय संघाचा भाग आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतका वेळ घालवला आहे की त्याला दबावाच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे हे माहित आहे. तो म्हणाला, म्हणूनच मला वाटतं प्रत्येक गोष्ट तुमच्यापासून सुरू होते. जर तुम्ही काही वेळ शांत बसलात तर सर्व काही ठीक होईल.
रोहित शर्माची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली होती परंतु दुखापतीमुळे तो त्या दौऱ्यावर गेला नाही. यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाची धुरा सांभाळली. भारताने ती मालिका ३-० ने जिंकली.
पत्रकार परिषदेत विराटसोबतच रोहितने टी-20 साठी टीम कॉम्बिनेशनबद्दलही सांगितले. तो म्हणाला मी टी-20 सामन्यांमध्ये कोणताही प्रयोग करण्याच्या बाजूने नाही आणि करणारही नाही. ‘प्रयोग’ हा शब्द अगदी ओव्हर-रेट केलेला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील.
टीम इंडियामध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना संधी दिली जाईल का, असे विचारले असता? रोहित म्हणाला आमची योजना सर्व खेळाडूंची चाचणी घेण्याची आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आम्हाला संधी द्यायची आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे. अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. विश्वचषकापर्यंत कोण तंदुरुस्त असेल हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल.