‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत आज विवाहबंधनात अडकला आहे. रोहितने त्याची गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरसोबत लग्नगाठ बांधली (rohit raut and juilee joglekar wedding)आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर आज अखेर ते दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथी झाले आहेत. त्यांच्या या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रोहित आणि जुईलीचा पुण्यातील प्रसिद्ध ढेपेवाड्यात पारंपारिक अंदाजात विवाहसोहळा पार पडला. याच ठिकाणी रोहित आणि जुईलीची खास मैत्रीण मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा लग्नसोहळा पार पडला होता. तर आता रोहित-जुईली त्यांच्या लग्नासाठी याच ठिकाणची निवड केली असून या लग्नात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले.
रोहित-जुईलीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेकजण लाईकचा वर्षाव करत आहेत. तसेच कमेंटद्वारे या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. यापूर्वी रोहित-जुईलीच्या हळदी, मेहंदी तसेच साखरपुडा समारंभाचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
रोहित राऊतने २००९ साली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमध्ये सहभागी झाला होता. तसेच यामध्ये त्याने टॉप ५ मध्ये जागा मिळवली होती. रोहितने या शोचे विजेतेपद मिळवले नसले तरी त्याने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. आतापर्यंत रोहितने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.
रोहितने प्लेबॅक सिंगरच्या रूपात ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’, ‘वन वे तिकिट’, ‘अवताराची गोष्ट’, ‘वजनदार’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मराठीसोबत हिंदीतही त्याने आपल्या गायनाचे कौशल्य दाखवले आहे. हिंदीतील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलमध्येही २०१९ साली तो झळकला होता.
दुसरीकडे रोहितची होणारी बायको जुईलीसुद्धा गायिका आहे. ती मुळची पुण्याची आहे. जुईलीने सारेगमप सुर नव्या युगाचा या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोची ती विजेतासुद्धा बनली. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुईली नेहमीच सक्रिय असते. तसेच तिचं युट्यूब चॅनलदेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आहेत ४ लग्न, चौथी पत्नी तर होती २९ वर्षांनी लहान
‘या’ मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सने घातला होता धुमाकूळ, सीन्स पाहून सेन्सर बोर्डली हादरले होते
Bigg boss: तेजस्वीच्या ‘या’ भूमिकेने जिंकली चाहत्यांची मने, म्हणाले, ‘हाच दृष्टीकोण कायम ठेव’