Share

नगरपंचायतीत 12 जागांवर विजय मिळवत रोहित पवारांनी मिळवली एक हाती सत्ता….

कर्जत नगरपंचायत निडणुकीचा निकाल लागला असून, याठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ 2 जागा जिंकता आल्या. ही निवडणूक भाजपचे माजी मंत्री राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.

यापूर्वी कर्जत नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. यावेळी ही निवडणूक 17 जागांसाठी झाली. त्यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळविली होती. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा वाद होऊन त्या जागांवरील निवडणूक स्थगित झाली. ती खुल्या प्रवर्गात समाविष्ठ करून पुन्हा घेण्यात आली. अशा 16 जागांसाठी आज मतमोजणी झाली.

कर्जत नगरपंचायतचा या पूर्वीचा इतिहास पाहिला तर, यापूर्वी नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. 17 पैकी 13 जागा भाजपला तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपंचायतीत खातेही उघडता आले नव्हते. पुढे विधानसभेत भाजपचे शिंदे यांचा परभाव करून आमदार पवार विजयी झाले. तेव्हापासून या मतदारसंघातील समीकरणे बदलत आहेत.

नगरपंचायत निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपचे अनेक कार्यकर्ते शिंदे यांची साथ सोडून पवार यांच्या गटात सामील झाले होते. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. यावेळी भाजपकडून पवार यांच्यावर दडपशाहीचा आरोप करून आंदोलनही करण्यात आले होते. या कारणामुळे कुठेतरी निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.

ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 22 डिसेंबरला 13 जागांवर मतदान पार पडलं. तर उर्वरीत 4 जागांसाठी काल मतदान झालं.  गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती, तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पवार यांचे वर्चस्व आणि शिंदे यांचे अस्तित्व या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची मानली जात होती.

महत्वाच्या बातम्या
उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सपाला जबर धक्का; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश
शरद पवार यांना पाहताच बहिणीला अश्रू अनावर; भावाबहिनीमधील प्रेम पाहून कार्यकर्ते गेले गलबलून….
निवडणूकीचा नाद सोड! अमित शहा आणि मोदींनी उत्पल पर्रीकरांना स्पष्टच सांगितले

राजकारण

Join WhatsApp

Join Now