Share

Nitesh Rane on Rohit Pawar : “रोहित पवार 2019 लाच भाजपातच येणार होते, ते फक्त शरीराने शरद पवारांसोबत!”, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Nitesh Rane on Rohit Pawar : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. एका बाजूला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असतानाच, दुसऱ्या बाजूला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबद्दल केलेल्या विधानाने अजूनच राजकारण तापवले आहे.

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या (Mirkarwada Port) विकासाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आलेले मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी बोलताना थेट सांगितले की, “रोहित पवार 2019 सालीच भाजपात येणार होते! ते मनाने भाजपचे आहेत. ते फक्त शरीराने शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यासोबत आहेत.”

राणेंच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता?

सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की रोहित पवार हे भाजपात येण्याच्या तयारीत होते. यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, “त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. ते भाजपच्या अनेक नेत्यांना भेटत होते. आम्ही जर नावं घेतली, तर त्यांना तोंड वाचवायलाही जागा उरणार नाही.”या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar group) गोटात मोठी खळबळ माजली आहे.

राणेंची मोठी घोषणा

कार्यक्रमाच्या निमित्ताने नितेश राणे यांनी कोकणवासीयांसाठी एक दिलासादायक बातमीही दिली. त्यांनी सांगितले की, “मुंबई (Mumbai) ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) सागरी मार्गावरील प्रवास फक्त ४-५ तासांमध्ये शक्य होणार आहे. माझगाव (Mazgaon) ते रत्नागिरी (Ratnagiri) प्रवास अवघ्या तीन तासांत होईल. त्यानंतर पुढील स्टॉप विजयदुर्ग (Vijaydurg) आणि शेवटी सिंधुदुर्ग.”

“एम-टू-एम फेरी (M2M Ferry) सेवा लवकरच सुरू होणार असून, यात १५० गाड्या आणि ५०० प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल,” असेही नितेश राणे यांनी सांगितले. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now