शिवसेना, मनसे पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते देखील अयोध्येला जाण्यास निघाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आता अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं.
५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत. तर त्यापूर्वी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री अयोध्येचा दौरा करण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे आता रोहित पवार दौऱ्यावर निघल्याने राजकारण चांगलेच तापणार आहे. अचानक ठरलेल्या या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सध्या काही कामानिमित्त रोहित पवार दिल्लीत आहेत. तिथूनच ते अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.
रोहित पवारांच्या दौऱ्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, उद्या (शनिवारी) दुपारी १२ वाजता रोहित पवार अयोध्येला पोहोचतील. त्यानंतर रोहित पवार रामलल्लाचं दर्शन घेतील. रोहित पवार अयोध्या दौऱ्यात राम मंदिर आणि घाटांनाभेट देणार आहेत. तर दुसरीकडे राज्यात भोंगा आणि हनुमान चालिसा हे मुद्दे चर्चेत आहेत.
राज ठाकरेंच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते मात्र कडाडून विरोध करताना पाहायला मिळत आहे. भोंगा वादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील राज यांना लक्ष केलं आहे. मात्र असे असताना देखील रोहित पवार हे अयोध्येसाठी रवाना होणार आहे.
दरम्यान, राजकीय दृष्ट्या रोहित पवारांचा अयोध्या दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ती घटना मी कधीच विसरणार नाही, कोर्टात ढसाढसा रडत अंबर हर्डने सांगितला जॉनी डेपसोबतचा किस्सा
चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या ‘या’ अभिनेत्यांचा बदलला काळ, लवकरच कारकीर्द आली संपुष्टात
VIDEO : नुसरत भरुचाला कंडोम विकताना पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले सडेतोड उत्तर, म्हणाली..
सलमानसोबत ईद साजरी करण्यासाठी कंगनाने केला बक्कळ खर्च, आकडा वाचून डोळे होतील पांढरे