Share

रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडूभरुन कौतूक, म्हणाले, फडणवीस साहेबांची….

राष्ट्रवादीचे तरुण नेतृत्व कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. यासंदर्भात केलेले त्यांचे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे. (Rohit Pawar praised Devendra Fadnavis)

रोहित पवार यांनी राज्यातील तरुणांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातील एक निवेदन देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यानंतर ट्विट करत रोहित पवार यांनी म्हंटले की, ‘फडणवीस साहेबांची कार्यशैली अजितदादांप्रमाणे भाराणारी आहे.’

रोहित पवार यांनी असे ट्विट करत आपले राजकीय विरोधक असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची तुलनाच अजित पवार यांच्यासोबत केल्याचे स्पष्ट दिसते. रोहित पवार हे स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले होते.

एमपीएससीच्या कक्षेबाहेर येणाऱ्या दुय्यम पदांसाठी भरती प्रक्रिया दुय्यम भरती मंडळांकडून न करता या सर्व पदांची भरती एमपीएससी आयोगामार्फतच केली जावी, अशी विनंती यावेळी रोहित पवार यांनी केली.

यापूर्वीही दुय्यम भरती मंडळे, जिल्हा निवड समिती, विशिष्ट महापोर्टल यांच्या माध्यमातून होणाऱ्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अपारदर्शकता आढळल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत.

सध्या अडीच हजार रिक्त पदे विविध खात्यांमध्ये आहेत. त्यातील फक्त २५ हजार पदांची भरती एमपीएससी आयोग कक्षेत येते. पुन्हा एकदा त्या भरती प्रक्रियेत कोणत्या प्रकारचा घोटाळा होऊ नये. यासाठी या सर्व पदांची भरती प्रक्रिया राज्याच्या एमपीएससी आयोगामार्फत व्हावी, असे निवेदन पत्र रोहित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले.

महत्वाच्या बातम्या-
औरंगाबादचे राजकारण तापणार, संजय शिरसाटांना आव्हान देण्यासाठी ठाकरेंनी उतरवला ‘हा’ हुकुमी एक्का
Mukesh Khanna : ‘तुम्ही मुर्ख आहात’, नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर भडकला ‘शक्तीमान’, वाचा नेमकं काय घडलं?
..तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ताई चुकीच्या वेळी आलात, माझ्याकडे द्यायला काहीच नाही’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now