झी मराठी वाहिनीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवा कुकरी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये प्रशांत दामले परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. या शोमध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत आपले कुकिंग कौशल्य दाखवत आहेत. तर आता आगामी भागात शोमध्ये राजकारणी मंडळी येऊन किचन सांभाळताना दिसून येणार आहेत. याचा एक प्रोमो व्हिडिओ वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.
झी मराठी वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पाहायला मिळत आहे की, शोमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सहभागी झाले आहेत. यावेळी या सर्व राजकारण्यांनी खूपच धमाल केल्याचे या प्रोमोत पाहायला मिळत आहे.
यादरम्यान या सर्व राजकारण्यांमध्ये खुर्चीचा डाव रंगतानाही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. विसरलेले पदार्थ आणण्यासाठी त्यांना या खेळाचा सामना करावा लागणार आहे. तसेच यावेळी पंकजा मुंढे यांनी गटारी अमावस्येदरम्यानचा त्यांचा एक मजेशीर किस्साही सांगितला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्या. प्रोमो पाहूनच आगामी भाग प्रेक्षकांसाठी खूपच धमाकेदार राहणार असल्याचे लक्षात येत आहे.
दरम्यान, या शोमध्ये आता एक नवा बदल करण्यात आला आहे. शोमध्ये जयंती कठाळे या राज शेफ म्हणून भूमिका बजावत स्पर्धकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असत. तर आता त्यांच्या जागी प्रसिद्ध युट्यूबर मधुरा बाचल या दिसणार आहेत. यासंदर्भात मधुरा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे.
मधुरा यांनी इन्स्टाग्रामवर पंकजा मुंढे, प्रणिती शिंदे आणि रोहित पवार यांच्यासोबतचा किचन कल्लाकारच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘नवीन वर्षाच्या सर्वांना खमंग, खुसखुशीत नी गोडच गोड शुभेच्छा. नवीन वर्षात काहीतरी नवीन. सर्व पक्षांनी एकत्र येऊन निःपक्षपणे काय काय बनवले आणि धमाल केली बघायला विसरू नका किचन कल्लाकारमध्ये’.
महत्त्वाच्या बातम्या :
‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
आपल्याच धर्मातील लोकांवर भडकली उर्फी जावेद; म्हणाली, पुरूष लग्नाच्या आधी महिलांना..
साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ? जाणून घ्या कारण
VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..