राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज पुण्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. (rohit pawar object controversial statement of governor bhagat singh koshyari)
याचाच धागा पकडत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह,’ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे.#राज्यपाल_माफी_मागा
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2022
दरम्यान, ‘राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती, असे रोहित पवार म्हणाले.
तसेच खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं, असा गर्भित इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे. याचबरोबर सोशल मीडियातून देखील राज्यपालांवर टीकेचा भडिमार होत.
महत्त्वाच्या बातम्या
‘2024 मध्ये दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार,’ शिवसेनेच्या वाघाने फोडली डळकाळी
‘पुष्पा’ च्या श्रीवल्ली गाण्यावर रितेश करत होता डान्स; जेनेलियाने हिमेश रेशमियाच्या गाण्याचा असा दिला तडका
‘समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
‘एक रुपया जरी खाल्ला असेल तर स्वतःचे हात तोडून टाकील’ म्हणत बच्चू कडूंनी फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप