rohit pawar : अमोल कोल्हे शहांच्या भेटीला तर पवारांचा ‘जय श्रीराम ‘चा नारा; वाचा नेमकं राष्ट्रवादीत घडतंय काय?

rohit pawar : राज्यात सत्तांतर होताच राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढू लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधक देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखाण्यास व्यक्त आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे हे आपली सून खासदार रक्षा खडसेंसह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेली होते. पण भेट झाली नाही. या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. खडसे खरंच राष्ट्रवादी सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला.

नुकतीच राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे आता कोल्हे देखील पक्षांतर करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. शहा आणि कोल्हे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जवळीकीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. असं असतानाच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘जय श्रीराम ‘चा नारा दिल्याने अधिकच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना वेग आला आहे.

दरम्यान, कोल्हे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी रावण दहन कार्यक्रमानिमित्त ‘जय श्रीराम’ असे ट्वीट केले आहे. याआधी रोहित पवार यांनी अयोद्धा दौरा केला होता. रोहित पवार यांची भूमिका भाजपच्या जवळपास जाणारी असल्याचं आता बोललं जातं आहे.

यावर अद्याप राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. याच बरोबर भाजप नेत्यांनी देखील याबाबत कोणतेही भाष्य केलं नाहीये. सध्या राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित झाला असून यावर जेष्ठ नेते काय भूमिका घेणार? हे देखील महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर 
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण 
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ