Share

rohit pawar : शरद पवारांंनंतर आता नातवाचीही क्रिकेटमध्ये एंट्री, रोहित पवार बनले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष 

rohit pawar

rohit pawar is new president of maharashtra cricket association | क्रिकेटच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या पाठोपाठ आता त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांचीही एंट्री झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार हे होते. पण आता रोहित पवार हे या असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणूकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजयी झाला आहे. त्यानंतर असोसिएशन कमिटीची एक बैठक गहुंजे स्टेडियमवर घेण्यात आली होती. त्या बैठकीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ सदस्यांमध्ये रोहित पवार यांची निवड झाली.

त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या अध्यक्षपदीही रोहित पवार यांची निवड झाली आहे. तसेच शरद पवार यांनी सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. पण त्यांनी भाजपच्या आशिष शेलारांसोबत निवडणुकीत युती केली होती.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या सदस्यापदी आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल रोहित पवारांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आहे. रोहित पवारांनी एक फेसबूक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहे.

रोहित पवारांची फेसबूक पोस्ट-
#MCA च्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल MCA च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, मा. Ajit Pawar दादा आणि Supriya Sule ताई यांचा पाठिंबा,

तसंच mca चे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत,सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं.

क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता #MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.
पुनश्च सर्वांचे आभार!

महत्वाच्या बातम्या-
पत्र्याच्या शेड मध्ये व्यवसाय सुरू करून कमावले चक्क 400 कोटी! माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क
उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तरांची भेट; म्हणाली,”अखेर मी माझ्या आजोबांना भेटले
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा, गुवाहाटीत ‘या’ ठिकाणी दिसली शीना बोरा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now