Share

rohit pawar : पवारांचा गनिमी कावा! कुणालाही कळू न देता बेळगावात पोहचले अन् केले असे काही की…

rohit pawar

rohit pawar in belgaon  | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यात सध्या वाद सुरु आहे. विरोधी पक्षातील नेतेही यावरुन आक्रमक होताना दिसून येत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर हा वाद मिटावावा असे विरोधी पक्षातील नेते सरकारला सांगताना दिसून येत आहे. अशात काही नेत्यांनी कर्नाटकात जाऊन भूमिका घेऊ, असेही म्हटले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे राज्यातील नेते बोम्मई यांच्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्य सरकारने लवकर भूमिका घेतली नाही, तर जनतेला शांत करण्यासाठी आपल्याला कर्नाटकात जावं लागेल, असे म्हटले होते.

आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अचानक बेळगावात पोहचले आहे. त्यांनी बेळगावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेतली आहे.

बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यासह काही गावांवर आपला हक्क असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्यातून त्यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. त्यावेळी शरद पवारांनी वातावरण शांत झाले नाही तर आपण कर्नाटकात जाऊन तेथील जनतेला शांत करणार असल्याचे म्हटले होते.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1602525214021103616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1602525214021103616%7Ctwgr%5E6720a21499706993f7308b6d5d98af49131fc18b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fkolhapur%2Fncp-mla-rohit-pawar-in-belgaum-in-the-wake-of-border-disputes%2Farticleshow%2F96191316.cms

त्यानंतर रोहित पवार आता बेळगावात पोहचले आहे. रोहित पवारांनी यावेळी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी बेळगावातील मराठी बांधवांशी सुद्धा चर्चा केली आहे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो रोहित पवारांनी शेअर केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक वाद वाढताना दिसून येत आहे. अशात कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे पासिंग असलेल्या ट्रकवर हल्ला केला होता. त्यांनी ट्रकच्या काचा फोडल्या होत्या. त्यामुळे हा वाद आता वाढताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
chandrakant patil : चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीला आंबेडकरांचे समर्थन, कायकर्त्याला जाहीर केले १ लाखांचे बक्षीस
pune : दुकान बंद करणार नाही, जे करायचं ते करा; बंदला विरोध करत पुणेकर महीलेना कार्यकर्त्यांनाच झापले..
पाकीस्तान सिनेमा करण्याच्या तयारीत आहे रणबीर कपूर; म्हणाला, कलाकाराला कोणतीही सीमा नसते

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now