rohit pawar answer to nitesh ranne | अहमदनगरमधील प्रतिक पवार नावाच्या युवकावर गुरुवारी काही लोकांनी हल्ला केला होता. एका जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. प्रतिकवर सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी हल्लेखोरांना इशारा दिला होता.
नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्याने राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका हिंदुची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावतीत एका हिंदूची हत्या झाली. त्यानंतर आता अहमदनगरच्या कर्जतमधील युवकावर हल्ला झाला. या सर्व गोष्टींवर आमचे बारीक लक्ष आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही आधीच एक सांगून ठेवतो, आता जर हिंदूंना टार्गेट केलं, तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. त्यासाठी आम्ही पुर्णपणे तयार आहोत, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिली आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितेश राणे यांनी असे म्हटले आहे.
आता नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत.कारण संतशिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत.
सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत.कारण संतशिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत.त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं.आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 6, 2022
पुढे रोहित पवार म्हणाले की, या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं.आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देतेय, परंतु याबाबत आवाज उठवायला ‘आमचं हिंदुत्व’ कधी जागृत होत नाही.
तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आमचा’ तिसरा डोळा कधी उघडत नाही. पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका आहे, असेही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या रोहित पवार यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
BJP: भाजप नेत्याचे एकनाथ शिंदेंच्या पुत्राला आव्हान? म्हणाले, कल्याण लोकसभेत आता कमळ फुलणार
Shahrukh khan: ज्या मराठी अभिनेत्याला शाहरुखच्या वॉचमननं दारातही उभं केलं नव्हतं, आता तोच करतोय किंग खानसोबत काम
suicide: पत्नीकडून होणाऱ्या छळा विरोधात लढणाऱ्या तरूणाची अखेर पत्नीच्याच छळाला कंटाळून आत्महत्या