Share

रोहित पाटलांनी विरोधकांना शब्द खरा करून दाखवला; निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, ‘माझा बाप नक्की आठवेल’

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला आहे. कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर विरोधकांना उत्तर देताना, ‘विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रोहित पाटलांनी दिला होता.

रोहित पाटील यांनी केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरवलं आहे. कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. विरोधकांना फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.” कवठेमहाकांळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती.

या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या विरोधात तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील सगळे बडे नेते एकवटले होते. पण या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत विजय मिळला आहे. “आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय. या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता”, असे रोहीत पाटील आर आर आबांची आठवण काढताना म्हणाले.

आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ मधील जनतेला दिलं आहे. “कवठेमहांकाळमध्ये पाणी प्रश्नावर सगळ्यात आधी आम्ही काम करायला सुरुवात केली होती. आताही तेच काम पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत”, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे.

कवठेमहांकाळ शहरात निवडणूक लढवत असताना आपलं शहर कसं असलं पाहिजे आणि आजपासून पुढच्या वीस-तीस वर्षात शहराचा कसा विकास झाला पाहिजे, याचं व्हिजन आम्ही ठरवलं आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शुल्लक फायद्यासाठी तीन मायलेकींनी ४२ लेकरांचा केला खुन, वाचा महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेबद्दल..
‘या’ अभिनेत्रीमुळे मोडला धनुष आणि ऐश्वर्याचा १८ वर्षांचा सुखी संसार
सिनेसृष्टीत खळबळ; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याच्या कडेला गोणीत सापडला मृतदेह

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now