भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सामना रंगला. भारतीय चाहत्यांना जे हवे होते, ते अगदी तसेच घडले. रोहितच्या नेतृत्वाखाली सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत हा सामना ताब्यात घेतला.
पाकिस्तानकडे प्रथम फलंदाजी आली. त्यांच्या खराब फलंदाजीमुळे १४८ धावांचे लक्ष भारतीय संघासाठी बनलं. हे साध्य करताना हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या जोडीने संघाला मोलाची साथ दिली. ३११दिवसांनंतर पाकिस्तानविरुद्धच्या या विजयामुळे कर्णधार खूप खूश होता आणि हार्दिकच्या कामगिरीने तो खूप प्रभावित झाला होता.
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी आणि त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आलेला दिसला. सामना संपल्यानंतर झालेल्या पोस्ट मॅच समारंभात संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले.
रोहित शर्मा म्हणाला,निम्मे टार्गेट पूर्ण करेपर्यंत, आम्हाला माहित होते की आम्ही जिंकू शकतो. आम्हाला पूर्ण विश्वास होता, आपला विश्वास असेल तर सर्वकाही शक्य आहे. खेळाडूंना त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे कळावी याची स्पष्टता आहे.
तसेच म्हणाला, भारताच्या वेगवान गोलंदाजीने गेल्या एक-दोन वर्षात बरीच मजल मारली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेतले आहे. हार्दिक बद्दल बोलताना म्हणाला, जेव्हापासून त्याने हार्दिकचे पुनरागमन झाले तेव्हापासून तो विलक्षण खेळत आहे.
३११ दिवसांनंतर भारतीय संघाच्या या विजयाचा हिरो ठरला संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. त्याने संघासाठी बॉल तसेच बॅटने उत्कृष्ट कामगिरी दाखवली. त्याच्या कामगिरीनंतर रोहित शर्माने त्याचे कौतुक केले, हार्दिकने घेतलेल्या मेहनती बद्दल सांगितले.
म्हणाला, जेव्हा हार्दिक संघाचा भाग नव्हता, तेव्हा त्याने त्याच्या खेळासाठी आणि त्याच्या तंदुरुस्तीसाठी काय करावे लागेल याचा विचार केला आणि आता तो १४०+ वर सहजतेने गोलंदाजी करत आहे. त्याच्या फलंदाजीचा दर्जा आपल्या सर्वांना माहीत आहे आणि तो परत आल्यापासून ती आणखी चांगली झाली आहे.
तसेच रोहित शर्मा हार्दिक बद्दल म्हणाला, तो आता खूप शांत झाला आहे आणि त्याला काय करायचे आहे याबद्दल अधिक आत्मविश्वास आहे, मग ते बॅटने असो वा चेंडूने. तो खरोखरच वेगवान गोलंदाजी करू शकतो. आज त्याची गोलंदाजी दिसली. हाच त्याचा खेळ समजून घेणे आवश्यक आहे आणि आता तो चांगली कामगिरी करत आहे.