Rohit Sharma, Dinesh Karthik, Trophy/ टीम इंडियामध्ये अशी परंपरा आहे की, मालिका जिंकली तर फोटो सेशनमध्ये ट्रॉफी सर्वात तरुण खेळाडूच्या हातात असते, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध असे दिसले नाही. रोहित शर्माने ट्रॉफी संघातील सर्वात वरिष्ठ क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या हातात सोपवली. यानंतर हार्दिक पांड्याही हसताना दिसला. पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिक रोहित शर्माच्या रागाचा बळी ठरला होता, पण पुढच्या दोन सामन्यात तो हिरो ठरला, तेही संपूर्ण मालिकेत फक्त 8 चेंडू खेळून.
खरेतर, दुसऱ्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी 9 धावांची गरज असताना मैदानात उतरलेल्या दिनेश कार्तिकने दोन चेंडूत खेळ संपवला. षटकार आणि चौकार मारून त्याने दबावाच्या खेळात आपल्यावर किती विश्वास ठेवता येईल हे सिद्ध केले. तिसऱ्या सामन्यात तो मैदानात उतरला तेव्हा भारत विजयाच्या जवळ होता आणि दिनेश कार्तिकने एका चेंडूवर एक रन घेतली.
C.H.A.M.P.I.O.N.S 🏆#TeamIndia🇮🇳 #INDvAUS pic.twitter.com/qrQBCO4U1T
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 25, 2022
शेवटच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने 6 विकेट्सने मालिका जिंकली. 3 सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे टीम इंडियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. 187 धावांचा पाठलाग करताना भारत मैदानात उतरला तेव्हा सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
केएल राहुलने लवकरच त्याची विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र 17 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर रोहितची विकेट गेली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या बळावर भारताने हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला.
सूर्यकुमार यादवने अवघ्या 36 चेंडूत 69 धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने 48 चेंडूत 63 धावा केल्या. भारताला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती, तिथे टीम इंडियाने विराट कोहलीची विकेटही गमावली पण हार्दिक पांड्याने 1 चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाला 6 विकेटने विजय मिळवून दिला. भारताने सामना जिंकण्यासोबतच मालिकाही 2-1 अशी जिंकली.
महत्वाच्या बातम्या-
विराटबद्दल प्रश्न विचारताच भडकला रोहित शर्मा, म्हणाला, त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी…
Virat Kohli: संपुर्ण सामन्यात रोहित शर्माने विराटला स्वत:जवळ फिरकूही दिले नाही, ‘हे’ होते त्यामागचे कारण
रोहित शर्मामुळे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यात खडाजंगी; काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ