रोहित शर्मा: बांगलादेश आणि भारत यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवार, 7 डिसेंबर रोजी मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला गेला. ज्यात बांगलादेशने भारताचा ५ धावांनी पराभव करत मालिका २-० ने जिंकली. पहील्या सामन्यातही भारताचा पराभव झाला होता.
मात्र, दुखापतग्रस्त असतानाही अखेरीस रोहित शर्माने फलंदाजीला येत झंझावाती अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या चेंडूवर षटकरा न मारता आल्याने त्यात तो अपयशी ठरला. त्याचवेळी, सामना गमावल्यानंतर हिटमॅनने (रोहित शर्मा) मोठे वक्तव्य केले आहे.
शेवटी, कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 182.14 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 28 चेंडूत 51 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. ज्यामध्ये 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांचाही समावेश होता. मात्र असे असतानाही तो संघासाठी सामना जिंकण्यापासून एक हिट दूर राहिला.
त्याचवेळी सामना इतक्या जवळून गमावल्यानंतर कर्णधार रोहितनेही हाताला झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले. तो (रोहित शर्मा) म्हणाला की, “ही अंगठ्याची दुखापत फार मोठी नाही. अंगठ्याला थोडासे लागले आहे आणि काही टाके पडले आहेत. सुदैवाने फ्रॅक्चर झाले नाही आणि त्यामुळे मला फलंदाजी करता आली.
जेव्हा तुम्ही सामना गमावता तेव्हा त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू असतात.बांगलादेशची अवस्था 69/6 असताना त्यांना 270 पर्यंत पोहोचू देणे ही आमच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी नव्हती. आम्ही चांगली सुरुवात केली पण मधली षटके आणि शेवट आम्हाला खूप त्रास देत आहेत. गेल्या सामन्यातही असेच घडले होते.”
कर्णधार रोहित शर्माने आपल्या विधानात पुढे नमूद केले की, त्याला भागीदारी तोडण्याचे काम करावे लागेल. तो म्हणाला की मेहदी हसन आणि महमुदुल्लाह यांनी चांगली भागीदारी रचली पण आम्हाला अशी भागीदारी तोडण्याचे काम करावे लागेल. रोहित शर्मा म्हणाला की,
“हे असे काहीतरी आहे ज्यावर आपल्याला काम करणे आवश्यक आहे. आम्ही महेदी आणि महमुदुल्ला यांना श्रेय देऊ इच्छित नाही असे नाही, त्यांच्यात चांगली भागीदारी होती, परंतु आम्हाला अशा भागीदारी तोडण्याचे मार्ग शोधावे लागतील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, भागीदारी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
जेव्हा तुम्हाला भागीदारी मिळते, तेव्हा तुम्हाला ती मॅच-विनिंग पार्टनरशिपमध्ये रुपांतरीत होईल याची खात्री करावी लागेल. त्याने तेच केले. जर तुम्हाला त्या 70 धावांच्या भागीदारी मिळाल्या, तर संघासाठी खेळ जिंकण्यासाठी तुम्हाला त्यांचे 110-120 धावांच्या भागीदारीत रूपांतर करावे लागेल, कारण नवीन फलंदाजासाठी फलंदाजी करणे हे सोपे नाही.”
रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात वेगवान गोलंदाज दीपक चहरवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले आहे. दुसऱ्या वनडेत दीपकला दुखापत झाली होती. त्याला नीट गोलंदाजी करता आली नाही. त्याने फक्त 3 षटके टाकली. रोहित (रोहित शर्मा) कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता दीपक चहरसाठी हातवारे करत म्हणाला की,
“इनिंगच्या मध्यात धैर्य दाखवण्याची गरज आहे. दुखापतींबाबत काही चिंता आहेत, आम्हाला त्या शोधल्या पाहीजेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा तो भारताकडून खेळायला येतो तेव्हा त्याला 100 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान देता आले पाहीजे. आम्ही खेळाडूंना देशासाठी खेळण्यासाठी अर्धे तंदुरुस्त ठेवू शकत नाही म्हणून आम्ही त्यांच्या कामाच्या भारावर लक्ष ठेवले पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
भाजपचा खेळ खल्लास! आपने उखडली १५ वर्षांची सत्ता; केजरीवाल पुन्हा ठरले मोदींवर भारी
मोदींना बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर मोठा भाऊ झाला खूपच भावूक; म्हणाले ‘खूप मेहनत करतोस थोडा आरामही कर’
narendra modi : ब्रेकींग! महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमचा सुटणार; थेट मोदींची मध्यस्थी, कोल्हापूरात मोठ्या घडामोडी