प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. आजही या चित्रपटातील गाणं वाजल्यावर लहान मुलांपासून अगदी वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच जन ठेका धरतात. मात्र लातूरमध्ये वेगळाच ‘मुळशी पॅटर्न’ घडल्याची बातमी समोर आली आहे. मूळशी पॅटर्न चित्रपट पाहून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. (rohan ujalanbes murder case)
पोलिसांनी या हत्याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून त्यानं हत्येची कबुलीही केली आहे. प्रसिद्धीच्या भावनेनं त्याचं चक्क मुळशी पॅटर्न सिनेमा (Mulashi Pattern Marathi Movie) आणि मालिका पाहून हत्या केली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हत्या करण्यात आलेल्या रोहन उजळंबेशी त्याच्या मित्राचं भांडण झालं होतं. या भांडणाचा राग मनात ठेवूनच त्यानं धारदार शस्त्रानं रोहनवर जीवघेणा हल्ला केला.
अखेर लातुरात रविवारी घडलेल्या धक्कादायक हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे. रोहन उजळंबे हा इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, मित्र आणि त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात ठेवत मित्रानेच त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपले भांडण मिटले असून, आपण दोघे मित्र आहोत, असा विश्वास रोहन उजळंब याला मित्राने दिला होता.
दरम्यान, मित्राच्या बोलण्यावर रोहननंही सुरुवातील विश्वास ठेवला. पण मित्राच्या मनात भलताच राग दाटून होता. भांडणाची खुन्नस काढण्याच्या हेतून त्यांनं रोहनचा काटा काढण्यासाठी त्याचा खून करण्याचा विचार मारेकरी मित्राच्या मनात घोळत होते. अखेर रोहनची रविवारी सकाळच्या सुमारास भरदिवसा लातूर शहरात धारदार शस्ज्ञानं हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी खूनप्रकरणातील आरोपी मित्राला ताब्यात घेतले आहे. शाळेच्या दाखल्यावरुन त्याचे वय समोर येणार आहे.
पोलिसांनी मंगळवारी सकाळी घटनेनंतर पसार झालेल्या मित्राला पुण्यावरुन लातुरात येणाऱ्या एका ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी मुळशी पॅटर्न सिनेमा पाहून आणि मालिका पाहून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण हत्या केली, अशी कबुलीदी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बापाने मुलीवर केला वारंवार बलात्कार आणि नंतर मागितली माफी; बलात्काराचे कारण ऐकून पोलिस हादरले
‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीशीमुळे फडणवीसांचा हल्लाबोल
‘औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
अक्षय कुमारने घेतला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा अलिशान फ्लॅट, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील






