छत्तीसगडमधील एक भयानक घटना समोर आली आहे, जी ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहत आहे. एका हैवानाने सर्वप्रथम महिलेला ओढत दूरवर नेले त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच तो निर्दयी थांबला नाही त्यानंतर त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातले. मतिमंद महिलेसोबत ही घटना छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा येथे घडली आहे. महिलेचा मृत्यू झाला आहे.(Rod inserted into genitals after forcibly raping woman)
या भीषण घटनेचे वास्तव जाणून येथील प्रत्येकजण थक्क झाला आहे. प्रत्यक्षात बुधवारी एक महिला अत्यंत वाईट अवस्थेत रस्त्यावर आढळून आली. तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खोल खुणा होत्या. स्थानिकांनी तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला या 58 वर्षीय महिलेचा मृत्यू अपघाती गृहीत धरून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेवर केवळ क्रूरपणे हल्लाच झाला नाही, तर तिच्यावर बलात्कारासारखे गुन्हेही घडले आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली आणि परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. एका फुटेजमध्ये एक व्यक्ती वृद्ध महिलेला ओढून नेताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांकडून तरुणांची माहिती गोळा केली. काही वेळातच या तरुणाचे नाव किशन यादव असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्वरीत किशन यादवचा शोध सुरू केला आणि अखेरीस त्याला अटक केली. अटकेनंतर किशन यादवने पोलिसांना सांगितलेली क्रूरतेची कहाणी ऐकून पोलीसही थक्क झाले. किशनने पोलिसांना सांगितले की, त्याने मतिमंद महिलेला जबरदस्तीने आपल्यासोबत ओढले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. किशनच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याला विरोध करून ढकलले तेव्हा त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घुसवला.
मात्र किशनची क्रूरता संपली नाही. त्याने महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर डोक्यात दगड घातला. ती महिला विरोध करत होती म्हणून तिला मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आता किशन यादव कायद्याच्या कोठडीत आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आणि त्याची रवानगी कारागृहात केली.
महत्वाच्या बातम्या-
पुणे हादरलं! १२ वर्षीय मुलीवर स्टेशन परिसरातील सार्वजनिक शौचालयात बलात्कार, आरोपी फरार
घृणास्पद! चार शिकाऱ्यांनी जंगलात घुसून केला या मुक्या प्राण्यावर बलात्कार, व्हिडीओही काढला
महिलांवर बलात्कार करत आहेत एलियन, अनेकजणी गर्भवती; अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा खळबळजनक खुलासा
महिलांना घरातून उचलून नेऊन बलात्कार करण्याची उघडपणे दिली धमकी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महंतवर गुन्हा दाखल