‘रॉकस्टार’ चित्रपटातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नर्गिज फाखरीने काही काळच बॉलिवूड विश्वात काम केले. परंतु याकाळातच तिने चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे नर्गिनने बॉलिवूड सोडल्याचा धक्का चाहत्यांनाही चांगलाच बसला. आता चाहते तिच्या परत येण्याची वाट बघत असतानाच नर्गिजने आपण बॉलिवूड सोडल्याचे कारण समोर आणले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत नर्गिजला तु बॉलिवूड का सोडले असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने उत्तर देत सांगितले की, ‘कुठेतरी मला असं वाटत होतं की, माझ्यावर कामाचा दबाव वाढत आहे. त्यामुळे मी खूप तणावात होते.
मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही मिस करत होते.
पुढे तिने सांगितले की, मला आठवतं की, 2016 आणि 2017 मध्ये मला याची जाणीव झाली. मी बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यादरम्यान बरंच काही घडत होतं. मला ते थांबवायचंही होतं. माझं मन आणि शरीर यांचा समतोल राखण्यासाठी मला ते थांबवावं लागेल हे मला जाणवलं आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं.
यानंतर नर्गिजने म्हटले की, ‘कधीकधी एकटं राहणं कठीण असतं. माणूस म्हणून तुम्हाला सपोर्ट सिस्टमची गरज असते. म्हणून मी न्यूयॉर्कला परत गेले. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना खूप दिवसांपासून भेटले नव्हते. म्हणून जेव्हा मी परत गेले तेव्हा मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. आता मी पूर्णपणे निरोगी आहे’
नर्गिजने दिलेल्या या माहितीनंतर चाहत्यांना तिची प्रकृती आणि मानसिक अवस्था ठिक नसल्याचे समजले आहे. परंतु आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे नर्गिज पुन्हा बॉलिवूड विश्वात पदार्पण करेल का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहेत. नर्जिजने देखील आपल्या सध्याच्या कामाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान ‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण केलेल्या नर्गिजने आयटम साँन्गसही केले आहेत. धतिंग नाच, देसी गर्ल, ओये ओये हे साँन्गस नर्गिजचे लोकप्रिय आहेत. तसेच नर्गिजने अमावस, मदरास कॅफे, अझहर, मैं तेरा हिरो चित्रपटांमध्येही काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
पराभवानंतर मुंबईला आणखी एक दणका! ‘त्या’ चुकीप्रकरणी मोठी कारवाई; रोहीत शर्माला शिक्षा
आयपीएल सुरू होताच नवीन वादाला फुटले तोंड, ‘या’ संघावर बंदी घालण्याची चाहत्यांनी केली मागणी
“आज खरंच बाबा हवे होते”; अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत भावूक झाला मुलगा वरद
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, ‘या’ डॉक्युमेंट्रीला मिळालं नामांकन