supriya sule : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते मंडळी जोमाने कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य बारामती मतदारसंघाकडे अधिक असल्याच पाहायला मिळत आहे.
तस पाहायला गेलं तर बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. मात्र आता याच पवारांच्या बलेकिल्ल्याला भाजपने सुरुंग पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांच्यानंतर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांनी गोंधळ घातला होता.
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात गावकऱ्यांना भेट दिली होती. याच दरम्यान, गावकऱ्यांशी संवाद साधताना असताना भर कार्यक्रमामध्ये रस्त्याच्या वादावरून दोन गटात तुफान शाब्दिक वाद झाला होता.
विशेष बाब म्हणजे खुद्द सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी दोन्ही गटांना समजवल होतं. तेव्हा गावकऱ्यांशी बोलताना सुळे यांनी या रस्त्याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. अखेर सुप्रिया ताई सुळे यांनी आपला शब्द पाळला आहे. विशेष बाब म्हणजे गावकऱ्यांनी पेढे वाटले आहेत.
तब्बल दीड वर्षापासून गावातील अंतर्गत वादामुळे या रोडचे काम रखडले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी समन्वय साधून या रोडचे डांबरीकरण केले आहे. यामुळे ग्रामस्थांनी पेढे आणि फटाके वाजवत जल्लोष साजरा केले असल्याच वृत्त समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल