Share

ऋतुराजचे राज! गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १२ चेंडूत ठोकल्या ६० धावा; पाहा धडाकेबाज खेळी

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने  चेन्नई सुपर किंग्सच्या  नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडेच सोपवली आहे आणि धोनीनेही संघ हित लक्षात घेता त्याचा स्वीकार केला.
कर्णधार बद्दलताच  चेन्नई सुपर किंग्सचा  मॅच विनर खेळाडू चांगलाच रंगात आहे .त्याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड.  हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो – धो धुतो . जडेजाच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता .पण , ऋतुराजने १२ चेंडूत तब्बल ६० धावा काढल्या . तर एकूण ५७ चेंडूत त्याने तब्बल ९९ धावा काढून आपला खरा रंग दाखवला .
इतकंच नव्हे तर ६ चौकार आणि ६ षटकार ही ऋतुराजने आपल्या नावावर नोंदविले आहेत.  ऋतुराजने  डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारीही केली आणि चांगलाच चर्चेत आला . आता चहुकडे फक्त ऋतुराजचा’च बोलबाला होतोय . म्हणून हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो – धो धुतो म्हणावं लागेल .
ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक ९९ धावा
चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी २०३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते . पुण्यातील एमसीए स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने दोन गडी गमावून २०२ धावा केल्या . चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९९ धावा केल्या . तर डेव्हन कॉनवे ८५ धावांवर नाबाद राहिला . हैदराबादकडून टी नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या .
रवींद्र जडेजाने कॅप्टनशिप सोडताच ….
आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर होत्या . कारण रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सीएसकेचे कर्णधारपद सोडल्याचा निर्णय जाहीर केला. यातच महेंद्रसिंग धोनीने फक्त ८  धावा काढल्या . तो नटराजनच्या बॉलवर उमरान मलिककडून आऊट झाला . धोनीने फक्त ८  धावा काढल्या . त्यापैकी एक चौकार आहे . तर सर्वाधिक चांगल्या धावा ऋतुराज गायकवाडने काढल्या त्याने ५७ बॉलमध्ये ९९ धावा काढल्या .
आतापर्यंतची CSK’ची कामगिरी….
यंदाच्या हंगामात चेन्नईची सुरुवात खराब झाली आहे. चेन्नईच्या संघाला आठ सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादच्या संघाने आठ सामन्यात लागोपाठ पाच विजय मिळवले आहेत.  हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

https://twitter.com/TumchiGosht/status/1521367654774509568

महत्वाच्या बातम्या
IPL 2022: ‘या’ संघावर प्रचंड संतापले चाहते, म्हणाले, ‘१० वर्षात काहीही करू शकले नाहीत’
रोहित-कोहली नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूने जिंकले गावसकरांचे मन, IPL मध्ये घालतोय धुमाकूळ
IPL 2022: सलग ८ पराभवानंतर संघात होणार अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री, मुंबई इंडियन्सने दिले संकेत
अक्षय कुमारनंतर यशलाही मिळाली पान मसाल्याची करोडोंची ऑफर; पण त्याने घेतला ‘हा’ निर्णय

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now