रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.(Rituraj pushes the guard taking selfie video viral on social media)
या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड ग्राऊंडमॅनसोबत अपमानास्पद वर्तन केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक युजर्सनी या कृतीवरून भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडवर(Ruturaj Gaikwad) टीका केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडला ट्रोल केले जात आहे. रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दोन षटकांनंतर पावसामुळे थांबवण्यात आला. त्यावेळी भारतीय फलंदाज डगआउटमध्ये येऊन बसले. त्यावेळी एक ग्राऊंडमॅन त्या ठिकाणी आला. त्याने ऋतुराज गायकवाडकडे स्लेफीची मागणी केली.
त्यावेळी ऋतुराज गायकवाड दीपक हुड्डासोबत बसला होता. त्यावेळी भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने स्लेफी मागणाऱ्या ग्राऊंडमॅनला दूर जाण्यास सांगितले. ऋतुराज गायकवाडने त्या ग्राऊंडमॅनला हाताने दूर सारले. तसेच त्याला स्लेफीही दिला नाही. ऋतुराज गायकवाडने त्या ग्राऊंडमॅनला हाताने निघून जाण्यास सांगितले.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडवर जोरदार टीका होत आहे.अनेकांनी कमेंट करत भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडवर टीका केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘ऋतुराज गायकवाडची ही वागणूक अत्यंत वाईट आहे. त्याने ग्राऊंडमॅनसोबत योग्य वर्तन केले नाही.”
https://twitter.com/imarnav_904/status/1538549132482076673?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1538549132482076673%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fstatic.asianetnews.com%2Ftwitter-iframe%2Fshow.html%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2Fimarnav_904%2Fstatus%2F1538549132482076673%3Fref_src%3Dtwsrc5Etfw
तसेच दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘ऋतुराज गायकवाड ग्राऊंड स्टाफसोबत से का वागतोय? केवळ सेल्फीसाठी त्याच्याशी उद्धटपणे वागला आहे. सज्जन लोकांच्या खेळामध्ये असे वागणे योग्य नाही.” ऋतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे.
https://twitter.com/jeet_singh070/status/1538523569855991808?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1538523569855991808%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fstatic.asianetnews.com%2Ftwitter-iframe%2Fshow.html%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2Fjeet_singh070%2Fstatus%2F1538523569855991808%3Fref_src%3Dtwsrc5Etfw
महत्वाच्या बातम्या :-
प्रसिद्ध मराठी मालिकांमधील ‘त्या’ दृश्यांवर प्रेक्षक संतापले, म्हणाले, ‘लहान मुलांना तरी सोडा रे’
अग्निपथ योजनेविरोधात राकैश टिकैत यांनी थोपटले दंड, ४ लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत दाखल होणार
VIDEO: चुकीला माफी नाही! पुन्हा पाहायला मिळणार अरूण गवळीचा थरार, दगडी चाळ २ चा ट्रेलर लॉन्च