Share

‘या’ कारणामुळे लग्नात रितेश ८ वेळा जेनेलियाच्या पाया पडला होता; जेनेलियाने स्वत:च सांगितला किस्सा

ritesh deshmukh jenelia

ritesh jenelia wedding incident | सध्या रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा मराठी चित्रपट वेड हा चांगलाच चर्चेत आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश जेनेलिया कित्येक वर्षानंतरसोबत काम करताना दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने पहिल्यांदाच अभिनेत्यासह दिग्दर्शनही केले आहे.

या चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षाही खुप चांगली कमाई करत आहे. रितेश जेनेलिया या चित्रपटाचे प्रमोसन करताना दिसून येत आहे. त्यामुळे ते अनेक माध्यमांशी संवाद साधत आहे. अशात त्यांचे अनेक किस्सेही समोर येत आहे.

आता त्यांच्या लग्नात घडलेला एक प्रसंग समोर आला आहे. रितेश आणि जेनेलिया दोघेही सुपरडान्सर ४ मध्ये शादी स्पेशल या एपिसोडमध्ये येणार आहे. त्याचा प्रोमोही समोर आला आहे. त्या प्रोमोत एक डान्स आहे जे पाहिल्यावर जेनेलियाला आपल्या लग्नाची आठवण होते.

आता सगळीकडे नवनवीन ट्रेंड आले आहेत. अनेकजण नव्या पद्धतीने लग्न करत असले तरी जेनेलियाला मात्र पारंपारिक लग्न खुप आवडतात. तिचे लग्नही पारंपारिक पद्धतीनेच झाले होते. तिने आता तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे.

हा परफॉर्मन्स पाहून मला माझ्या लग्नाची आठवण झाली. आपण लग्नसोहळे नव्या पद्धतीने साजरे करतोय पण मला पारंपारिकच लग्न आवडतात. माझं लग्न पारंपारिक पद्धतीनेच झालं होतं, असे जेनेलियाने म्हटले आहे.

तसेच ती पुढे म्हणाली, प्रत्येक लग्नात काहीतरी होत असतं. आमच्या लग्नातही असंच काहीतरी झालं होतं, ज्याची कोणी अपेक्षाही केली नव्हती. निरोपाच्या वेळी मी खुप रडले होते आणि हसले होते. लग्नात एक प्रसंग तर असाही होता की रितेशने माझ्या आठवेळा पाया पडल्या होत्या.

तसेच जेनेलियाने रितेश घरी कसा वागतो हेही सांगितले आहे. रितेश झोपलेला असताना तो खुप घोरत असतो, असे तिने म्हटले आहे. तर यावर बोलताना रितेश म्हणाला की, जेनेलियाने सुद्धा हे मान्य केलं पाहिजे की मी तिला दिवसातून तीन वेळा आय लव्ह यु म्हणतो.

महत्वाच्या बातम्या-
18 रुपयांना नवी सायकल! आजोबांच्या काळातील सायकलचे बिल पाहून लोकांना आठवले जुने दिवस
Spielplatz : ‘या’ गावात कपडे घालण्यावर आहे बंदी, नग्नाअवस्थेत राहतात लोक, वाचून बसणार नाही विश्वास
टिम इंडीयाचा मिस्टर 360 सूर्याच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? वाचा त्याच्या कुटुंबाबद्दल सर्वकाही…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now