Share

रितेश-जेनेलियाच्या वेड चित्रपटाला लोकांची तुफान गर्दी, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

ved

ritesh jenelia movie ved first day collection  | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या वेड या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दोघेही खुप वर्षानंतर एकत्र झळकले आहे. वेड चित्रपटातील रितेश आणि जेनेलियाचा लुक भारावून टाकणारा आहे. याआधीही लोकांनी पडद्यावर त्यांच्या जोडीला पसंत केले होते.

आता दोघे पुन्हा वेड या चित्रपटातून चर्चेत आले आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.

या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया सोडून अनेक प्रसिद्ध कलाकारही आहे. रवी जाधव, जितेंद्र जोशी, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेच कलाकार या चित्रपटात आहे.

३० डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रितेशने लातूरच्या चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना भेटही दिली होती. तसेच हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला अशी विचारपूसही केली. तेव्हा अनेकांनी याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांना रितेश आणि जेनेलियासोबत अशोक मामांचा अभिनयही खुप आवडला.

या चित्रपटाला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक तिकीट काऊंटरवर गर्दी करताना दिसत होते. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २.२० कोटींचा गल्ला जमा केला आहे. हा आकडा फक्त शुक्रवारचा आहे.

शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाला तुफान गर्दी असणार आहे. कारण विकेंडसोबतच लोकं न्यु इयरचं सेलिब्रेशन करायलाही बाहेर पडताना दिसून येत आहे. त्यामुळे विकेंडला हा चित्रपट बक्कळ कमाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोन दिवसात वेड हा चित्रपट १० कोटींची कमाई करणार आहे, असे म्हटले जात आहे.

२.२० हा पहिल्या दिवसाचा आकडा कमी वाटत असला तरी हा मराठी भाषिक चित्रपट आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी मराठी चित्रपटसृष्टीत २.२० कोटींचा गल्ला म्हणजे चित्रपटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बक्कळ पैसे कमवण्याची शक्यता आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असलेले सेलिब्रिटी आहेत. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन कसे करायचे याचे तंत्र या दोघांकडून शिकण्यासारखे आहे. यापूर्वी रितेशने त्याच्या चित्रपटांचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करून प्रेक्षकांना त्याचे काम पाहण्यास भाग पाडले होते.

काही दिवसांपूर्वी रितेशच्या ‘वेड’ या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता. त्याचे कारण म्हणजे त्याच्या बाऊन्सरवरून पत्रकारांशी वाद झाला. बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख आणि नाव असलेल्या रितेशच्या अशा वागण्याने सगळे आश्चर्यचकित झाले. जेनेलिया सोशल मीडियावर ट्रोलही झाली होती. यासोबतच रितेशने माफी मागताना या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

सध्या रितेशच्या क्रेझची चर्चा आहे. अनेक वर्षांनंतर तो आपल्या वेड या कलाकृतीतून जगासमोर आला आहे. त्याचा आणि जेनेलियाचा पडद्यावरचा लूक अप्रतिम आहे. याआधीही प्रेक्षकांना दोन्ही चित्रपटांची केमिस्ट्री आवडली होती. आता ही क्रेझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वेडला चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
“… तर भीमा कोरेगावला जाऊन बघा”; महाराष्ट्राची हास्यजत्राफेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत
काहीही झालं तरी ‘हा’ पाकीस्तानी सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शीत होऊ देणार नाही; राज ठाकरेंची थेट धमकी
दारू पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे? वाचा भन्नाट ट्रिक्स…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now