चित्रपटसृष्टीतील ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, अलीकडेच तिने आपल्या माजी पती रितेशवर ( Riteish) अनेक आरोप केले होते आणि त्यांची तक्रार करण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशन देखील गाठले होते. तिने रितेशविरुद्ध एफआयआरही दाखल केला होता. तसेच मीडियासमोर ढसाढसा रडत तिने रितेशवर आरोप केला की त्याने तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले आहेत. यामुळे ती खूप अस्वस्थ आहे.(Rakhi Sawant, Drama Queen, Riteish, FIR, Account Hacked)
एवढेच नाही तर राखीने रितेशवर अनेक आरोपही केले होते. आता राखीने केलेल्या आरोपांवर रितेशने प्रत्युत्तर दिले आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की ती तीन वर्षांपासून माझा वापर करत होती. माझे पैसे काढून घेत होती. आता मी खर्च करणे बंद केले आहे, त्यामुळे ती असे आरोप करत आहे. राखीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही त्याने सांगितले.
राखी सावंतने केलेल्या आरोपांनंतर रितेश म्हणाला की, राखीने केलेल्या सर्व आरोपांना मी कायदेशीर उत्तर देईन. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी तिच्यावर करोडो रुपये खर्च केले, तेव्हा तिला काही त्रास होत नव्हता, जेव्हा मी खर्च करणे बंद केले तेव्हा तिने माझ्यावर असे आरोप करायला सुरुवात केली. तिच्या एकंदरीत या सर्व वागण्याचा मला त्रास झाला.
रितेश म्हणाला येणा-या काळात ती माझ्यावर आणखी अनेक घृणास्पद आरोप करू शकते, खरं तर तिला आणि आदिलला बिग बॉसच्या घरात जायचे आहे आणि हे सर्व नाटक याच कारणासाठी केले जात आहे. मी तिच्यापासून दूर आहे आणि माझ्या आयुष्यात आनंदी आहे.
मुलाखतीदरम्यान रितेश भावूक झाला आणि म्हणाला, राखी सावंतकडे ना कार होती ना तिच्या घरात काही सामान आहे. तिच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, मी तिला विकत घेऊन दिल्या आहे. ती खूप निर्लज्ज आहे, मी तिला विकत घेतलेल्या वस्तू ती आनंदाने वापरत आहे. राखी सावंतसोबतच्या लग्नाबाबत रितेश म्हणाला तिने याबद्दल बोलायला हवे. आता मी तिच्याशी पुराव्यानिशी बोलेन.
राखी सावंत आणि रितेशचे नाते सुरुवातीपासूनच वादात सापडले होते, कारण रितेशचे आधीच लग्न झाले होते. आता रितेशने राखीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलले आहे, तसेच त्याची पहिली पत्नी स्निग्धानेही त्याच्यासोबत असेच केले आणि राखीनेही असेच केले असल्याचे त्याने सांगितले. दोन्ही महिलांनी मला लुटले असून राखीने माझे शोषण केले आहे असेही तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या-
राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल
राखी सावंतला हात लावण्याचा प्रयत्न करत होता चाहता, कॅमेऱ्यात कैद झाली पुर्ण घटना, पहा व्हिडीओ
राखी सावंत आणि रितेशने घेतला घटस्फोट; कारण समोर आल्यानंतर चाहते झाले भावूक
कंगनाने सलमानची खिल्ली उडवल्यानंतर राखी सावंत भडकली, म्हणाली, जिभेवर नियंत्रण ठेव