Share

VIDEO: जेवणावर ताव मारताना रितेश देशमुखचे दिसले पोट; नेटकरी म्हणाले, ‘कितवा महिना चालू आहे?’

Riteish Deshmukh

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. याद्वारे तो अनेकदा त्याचे आणि जेनेलियासोबतचे मजेशीर व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडिओंना चाहत्यांचीही खूप पसंती मिळत असते. तर आताही रितेशने त्याचा असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रितेश जेवणावर मस्त ताव मारताना दिसून येत आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, रितेश हाताची बोटे चोखत जेवणाचा आस्वाद घेत आहे. तो खाण्यात इतका मग्न आहे की, त्याला त्याच्या शर्टचे एक बटण उघडे असल्याचेही भान नाहीये. तसेच शर्टचे बटण उघडे असल्याने त्याचे पोट दिसून येत आहे.

या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये रितेशने लिहिले की, ‘हे आहे लो कॅलरी मील’. यासोबतच रितेशने सांगितले की, ‘जेव्हा दिग्दर्शक वजन वाढवण्यास सांगतो तेव्हा असं होतं’. आणि हा दिग्दर्शक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून #mistermummy असल्याचे त्याने सांगितले. तर रितेशची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अनेकजण त्याच्या या व्हिडिओवर हसण्याच्या इमोजी देत मजेशीर कमेंटही करत आहेत. एकाने यावर कमेंट करत विचारले की, ‘कितवा महिना चालू आहे?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘गोलूमोलू रितेशदादा’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘सर तुम्ही हे काय केलात. मॅडमनी बघितलं तर वडा ढोकळा बनवणार तुमचा’.

दरम्यान, रितेश लवकरच ‘मिस्टर मम्मी’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत पत्नी जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा असून त्यासंदर्भातच रितेशने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करत आहेत. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे कथानक अशा जोडप्याभोवती फिरते ज्यांची मुलाच्या बाबतीतली विचारसरणी एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. रितेश-जेनेलिया यामध्ये या जोडप्याची भूमिका साकारत असून यामध्ये दोघांनाही गरोदर दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रेक्षकांना विनोदासोबत ड्रामा, सस्पेन्स आणि इमोशनसुद्धा पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, रितेश-जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मस्ती’ या चित्रपटात दोघे एकत्र काम केले. तर दीर्घकाळानंतर लवकरच ते दोघे ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे रितेश देशमुख पहिल्यांदाच दिग्दर्शत क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. तर जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
कौटुंबिक कार्यक्रमात मी फारसा हजर नसतो पण…; आदेश आणि सुचित्रा बांदेकरच्या मुलाची पोस्ट चर्चेत
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’मधल्या आदितीचा झाला साखरपुडा, होणारा नवरा करतो ‘हे’ काम
..त्यामुळे सागर कारंडेने लोकलच्या ट्रेनमधून धक्के खात केला प्रवास, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now