Share

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबत रितेश देशमुखने दिली हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाला, हा छोटा चित्रपट…

The Kashmir Files

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहून अनेकजण आपली प्रतिक्रिया देत चित्रपटाचे कौतुक करत आहेत. यादरम्यान मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता कौतुक करण्याची वेळ आहे’, असे म्हणत त्याने चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

रितेश देशमुखने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले की, ‘अनेक विक्रम मोडत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची ही वेळ आहे. एक छोटा चित्रपट जो आता एक मोठा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्री आणि द कश्मीर फाईल्सच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. खूप प्रेम आणि कौतुक’.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची घटना दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावदी, पुनीत इस्सर यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. सर्व कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात येत आहे.

११ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.५५ कोटींची जबरदस्त कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी, रविवारी १०.५० कोटी, सोमवारी १५.०५ कोटी असे एकूण चित्रपटाने ४ दिवसात ४२.२० कोटींची कमाई केली आहे. अद्यापही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे.

सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही हा चित्रपट धमाल करण्यास तयार आहे. झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम करण्यात येणार आहे. झी ५ च्या अधिकाऱ्यांनीही याबाबत पुष्टी केली नाही. परंतु झी ५ वर हा चित्रपट येणार असला तरी कधीपासून हा चित्रपट स्ट्रीम करण्यात येणार याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. पण ओटीटीवरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
सलमान आणि अमिर खानचे चित्रपट बायकॉट करा; ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून लोकांची मागणी
द काश्मिर फाईल्समध्ये शारदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला येत आहेत ‘असे’ मेसेज
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या यशानंतर.., स्वरा भास्करने विवेक अग्निहोत्रींना मारला टोमणा?

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now