अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपली पत्नी जेनेलिया डिसूजा हिच्यासोबत इन्स्टग्रामवर व्हिडीओ टाकत असतो. त्यात कधी तो पत्नीसोबत भांडताना दिसतो तर कधी आपल्या फनी स्टाइलने चाहत्यांना हसवताना दिसतो. आता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडीओ जेनेलिया सोबतचा नाही.
सध्या रितेश देशमुख ज्या फोटोमुळे चर्चेत आला आहे, तो व्हिडीओ त्याच्या आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतच्या डान्सचा आहे. त्यांच्या या एकत्रित डान्सला सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळाल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित किक चित्रपटातील ‘जुमे की रात है’ गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांचा डान्स आणि स्टेप्स दोन्ही चाहत्यांना खूप आवडत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचाही वर्षाव पाहायला मिळतोय. एका चाहत्याने कमेंट करत म्हणालं आहे की, भाऊ, वहिनी काय म्हणतील रे अशी कमेंट्स केली आहे.
तर दुसऱ्या चाहत्याने अप्रतिम डान्स. अशी कमेंट्स केली आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओमधील माधुरी दिक्षितचा डान्स पाहिला तर हैराण व्हाल. नुकताच रितेश आणि माधुरीचा एक डान्सचा व्हिडिओ प्रचंड प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी ‘काचा बादाम’ वर ताल धरला होता.
माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर पदार्पण केलं आहे. ओटीटी वेब सीरिज द फेम गेममध्ये माधुरीनं बाॅलिवूड सुपरस्टारची भूमिका केली आहे. या चमचमत्या दुनियेमागचं वास्तव किती भयानक आहे, हे यात दाखवलं आहे. लोकांना माधुरीचं हे काम देखील प्रचंड आवडलं आहे.