बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा (Riteish Deshmukh And Genelia D’souza) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहेत. नुकतीच या दोघांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या दोघांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
रितेश-जेनेलियाने चाहत्यांना दिलेली गुड न्यूज म्हणजे लवकरच ते दोघे एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘मिस्टर मम्मी’ असे या चित्रपटाचे नाव असून रितेश-जेनेलियाने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. या पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून येत आहेत. तसेच यामध्ये जेनेलिया खुश असल्याचे दिसत आहे. तर रितेश मात्र, तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे.
रितेशने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक कॉमेडी-ड्रामा एक आनंदाची बातमी घेऊन तुमचे दार ठोठावणार आहे. लवकरच हसण्याचा स्वागत होणार आहे’. तर दुसरीकडे जेनेलिया पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘एका हास्याचा प्रवास आणि अशी कथा जी याआधी कधीही पाहिली गेली नाही. तुमचे पोट दुखेपर्यंत मनापासून हसण्यासाठी तयार व्हा’. यासोबतच दोघांनीही त्यांच्या पोस्टमध्ये #मिस्टर मम्मी हे हॅशटॅग वापरले आहे.
रितेश आणि जेनेलियाकडून मिळालेल्या या गुड न्यूजनंतर चाहते त्यांच्यावर लाईकचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यांच्या या पोस्टवर भरभरून कमेंट करत आहेत. अनेकजण कमेंटद्वारे चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगत आहेत. तसेच त्यांच्या या आगामी चित्रपटासाठी रितेश-जेनेलियाला शुभेच्छा देत आहेत.
‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करत आहेत. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे कथानक अशा जोडप्याभोवती फिरते ज्यांची मुलांच्या बाबतीतली विचारसरणी एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. रितेश-जेनेलिया यामध्ये या जोडप्याची भूमिका साकारत असून यामध्ये दोघांनाही गरोदर दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रेक्षकांना विनोदासोबत ड्रामा, सस्पेन्स आणि इमोशनसुद्धा पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, रितेश-जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मस्ती’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. तर दीर्घकाळानंतर लवकरच ते दोघे ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे रितेश देशमुख पहिल्यांदाच दिग्दर्शत क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. तर जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘आपकी इज्जत एक बार गई तो गई, हम तो रोज रातको बेचतेही है, खतम ही नही होती’
मधूबालाच्या ९६ वर्षाच्या बहिणीला सुनेने काढले घराबाहेर; जेवणही दिले नाही, टॉर्चर केल्यामुळे झाली भयानक अवस्था
शुटींगच्या पहिल्याच दिवशी घ्यावी लागली गर्भनिरोधक गोळी, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा