बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख (Riteish deshmukh and genelia d’souza) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत असतात. नुकतीच जेनेलिया-रितेशने त्यांच्या असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक ट्विस्टसुद्धा पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रितेश-जेनेलियाने त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, सुरुवातीला दोघेही अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यानंतर अचानक हिमेश रेशमियाचा झलक दिखला आजा हे गाणं सुरु होतं. या गाण्यावर जेनेलिया जबरदस्त अंदाजात डान्स करते. त्यानंतर रितेशसुद्धा या गाण्यावर डान्स करू लागतो.
जेनेलिया-रितेशचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. चाहते त्यांच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असून त्यावर अनेक मजेशीर कमेंटही करत आहेत. आतापर्यंत त्यांचा हा व्हिडिओ कोट्यवधीपेक्षा अधिकवेळा पाहण्यात आला आहे. तर १४ लाखापेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या या व्हिडिओला पसंती दिली आहे.
दरम्यान, लोकांमध्ये ‘पुष्पा’चा फिवर अजूनही कमी झालेला दिसत नाहीये. सोशल मीडियावर दररोज या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स यावर अनेक रिल्स पाहायला मिळतात. हे व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण पुष्पाचे चाहते झाले आहेत.
रितेश-जेनेलिया बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहेत. २००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे दोघांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली. आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांनी लग्न केले. आज या दाम्पत्यांना दोन मुले आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास रितेश-जेनेलिया लवकरच ते दोघे ‘वेड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे रितेश देशमुख याद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. तर जेनेलिया या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. याशिवाय दोघेही ‘मिस्टर मम्मी’ नावाच्या एका कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
“मला शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर, मला एकदा तरी त्यांची भूमिका साकारायची आहे”
भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक; हॉटेलमध्ये नेणाऱ्या बसमध्ये सापडली ‘ही’ भयानक गोष्ट
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत? मकरंद अनासपुरेंसोबत साकारली होती महत्वाची भूमिका