रितेशचा श्रीवल्ली गाण्यावर डान्स पाहताच जेनेलियाने दिला धक्का आणि.., व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

मागील काही दिवसांपासून सर्वत्र ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाची क्रेझ आली आहे. या चित्रपटातील गाणे देखील सुपरहिट ठरले आहेत. या चित्रपटाने सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्व वेड लावले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मांधना होती. या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. या चित्रपटातील गाण्यांवर मागील अनेक दिवसांपासून रील बनवले जात आहेत.

 

नुकताच एका सेलिब्रिटी जोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख ही जोडी खूप लोकप्रिय आहे. रितेश आणि जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

 

हे दोघे नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून नेहमी प्रेमाचा वर्षाव होत असतो. जेनेलियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रितशेला डान्स करताना पाहून मध्येच जेनेलिया येते आणि झलक दिखला जा या गाण्यावर डान्स करू लागते. त्यानंतर जेनेलियासह रितेश देखील डान्स करू लागतो. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक बार आजा आजा अअअअआजा.”

 

रितेश आणि जेनेलियाबद्दल बोलायचे झाले तर, साल २००३ मध्ये यांचा ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून रितेशने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हे दोघेही जवळजवळ ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केले. याच वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण होऊन १० वे वर्ष लागले.

 

तसेच जेनेलियाचा साल २००८ ‘जाने तू या जाने ना’ हा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून तिला खरी लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडसह जेनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटापासून अंतर ठेवले. रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.