‘मला तुमची आठवण येते बाबा, तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये’; विलासरावांच्या आठवणीने रितेशला अश्रु अनावर

आज महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची जयंती आहे. जयंती निमित्त सर्व राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींनी विलासराव देशमुख यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जयंती निमित्त अनेकांनी देशमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राज्याच्या कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे सर्वमान्य, अजातशत्रू, हसतमुख व्यक्तिमत्वं, अशी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची ओळख होती. याचबरोबर एक हुशार, मनस्वी, माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती.

विलासरावांच्या जन्म दिवसाच्या निमित्तानं बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सोबत एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.

रितेश सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतो. साधारण हिंदी कलाविश्वात गाजलेलं मराठमोळं नाव आणि सर्वांच्याच मनावर राज्य करणारा अभिनेता अशी रितेश देशमुखची ओळख. विशेष बाब म्हणजे, एक व्यक्ती म्हणूनही कायमच तो सर्वांची मनं जिंकत असतो.

दरम्यान, विलासरावांच्या जन्म दिवसाच्या निमित्तानं रितेशनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं आपल्या शब्दांवाटे भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे,’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

वाचा काय आहे ती पोस्ट..? ‘मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. मला तो क्षण पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणता की, मी तुझ्या कायमसोबत आहे. मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची आठवण येते.’ रितेशने अशी पोस्ट लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
कभी ईद कभी दिवाली: सलमान खानला त्याच्या चित्रपटासाठी मिळाला साऊथमधील ‘हा’ खतरनाक विलेन
ऐश्वर्याने 30 वर्षांपुर्वी फक्त ‘एवढ्या’ पैशासाठी केले होते काम, 1992 च्या बिलाचा फोटो झाला व्हायरल
जो जिता वहीं सिंकदरच्या साईड रोलसाठी केलं रिजेक्ट, आज आहे बॉलिवूडचा नंबर वन खिलाडी