Share

रिषभ पंतकडे भारताचा कर्णधार होण्याची क्षमता; संघाला दोनदा विश्वकप जिंकून देणाऱ्या कॅप्टनचं मोठं विधान

दोन वेळा विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग यानं सध्या रिषभ पंत आणि रोहित शर्मा यांची तुलना करत एक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत येत आहे. रिकी पाँटिंगनं सांगितले की, भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जर रिषभ पंतला दिली तर, तो देखील यशस्वी कर्णधार ठरेल यात शंका नाही.

आयपीएल 15 च्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पाँटिंगने व्हर्च्युअल मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, आयपीएलसारख्या दबावाच्या स्पर्धेत अनुभव घेतल्याने, रिषभ आगामी काळात चांगले नेतृत्व करेल यात मला शंका नाही. तो एक आंतरराष्ट्रीय कर्णधार होऊ शकतो.

तसेच म्हणाला, रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, त्यावेळी तो तरुण होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं सुरु केलं होतं. आज रिषभ पंतच जितक वयं आहे, रोहितही त्यावेळी त्याच वयाचा होता. त्यांच्यात असे बरेच काही समान वैशिष्ट्ये आहेत, असे पाँटिंग म्हणाला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार पाँटिंग आता, दिल्लीचा मुख्य रणनितीकार आहे. दिल्लीचा संघ आणि खेळाडूंचा तो मुख्य मार्गदर्शक आहे. त्यामुळे, रोहित सारखं यश मिळवण्याचे सर्व गुण पंतमध्ये आहेत, असे त्याने केलेल्या वक्तव्यावर क्रिकेट चाहते विचार करू लागले आहेत.

सध्या रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे, तर रिषभ पंतकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे उद्या तो कर्णधार म्हणून मैदानावर रणनितीची कशी करेल? त्याची अंमलबजावणी कसा करेल? याबद्दल रिषभचे चाहते आणि एकूणच क्रिकेट चाहते विचार करू लागले आहेत.

पंतने आयपीएलमध्ये कर्णधारपद सिद्ध केले आहे. गेल्या मोसमात त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते आणि आता तो आयपीएल-2022 मध्येही या संघाचे नेतृत्व करणार आहे. दिल्लीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. पंतला त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्याची इच्छा आहे.

खेळ

Join WhatsApp

Join Now