भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. तिन्ही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील. एकदिवसीय मालिकेत पाहुण्या संघाला हरवल्यानंतर टीम इंडियाची नजर टी-20 फॉर्मेटमध्येही विजय संपादन करण्यावर असेल.(Rishabh Pantla promoted to vice-captain)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यष्टिरक्षक ऋषभ पंतची(Rishabh Pant) उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. पंत स्टार फलंदाज केएल राहुलची जागा घेईल, जो हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे तिसऱ्या एकदिवसीय आणि आगामी T20I मालिकेतून बाहेर पडला होता.
🚨 NEWS 🚨: Washington Sundar ruled out of @Paytm #INDvWI T20I series.
The #TeamIndia all-rounder suffered a left hamstring muscle strain during fielding in the third ODI against the West Indies played at the Narendra Modi Stadium on Friday.
More Details 🔽
— BCCI (@BCCI) February 14, 2022
बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली. प्रेस रिलीझनुसार, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. चेन्नईच्या या खेळाडूने प्रदीर्घ दुखापतीनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सुंदरच्या जागी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आयपीएल 2021 मध्ये ऋषभ पंतनेही आपल्या कर्णधारपदाने सर्वांना प्रभावित केले. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरली. मात्र, तिला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. आयपीएलच्या 14व्या हंगामात पंतने 16 सामन्यात 34.91 च्या सरासरीने 419 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके झळकली.
ऋषभ पंत आयपीएल 2022 मध्ये दिल्लीचे कर्णधारपदही सांभाळताना दिसणार आहे. लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एनरिक नोर्किया यांना कायम ठेवले. विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. ऋषभ पंतही कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील असल्याचं म्हटलं जात आहे.
भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (उप-कर्णधार/यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिनेराज चहल , भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव.
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 50 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, होईल मोठा नफा, सरकारही करेल मदत
…तर मी ‘त्या’ दलालाला जोड्यानं मारेन; संजय राऊत किरीट सोमय्यांवर बरसले
राऊत विरुद्ध सोमय्या: …तर मी राजकारण सोडेन; संजय राऊतांचे किरीट सोमय्या यांना आव्हान
भाजपला दणका! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आमदारांसह केला शिवसेनेत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ