Share

Rishabh Pant: ‘चले तो चाँद तक नहीं तो शाम तक’, ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने उडवली पंतची खिल्ली

rishabh pant

Rishabh pant | भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या निडर फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः त्याला भारताबाहेर परदेशी भूमीवर खेळायला आवडते. कधी कधी त्याची बेधडक वृत्ती भारतासाठी मैदानावर उपयुक्त ठरते आणि कधी-कधी त्याचा फटका संघाला सहन करावा लागतो.

या बेधडक वृत्तीच्या विरोधात जाऊन पंतने भारतीय संघाला मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर राशिद लतीफने पंतवर मोठे वक्तव्य केले आहे. त्याने पंतची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर चाहते त्याच्यावर संतापले आहेत.

मँचेस्टरमध्ये भारताला नेत्रदीपक विजय मिळवून देणाऱ्या पंतने आपले पहिले एकदिवसीय शतकही झळकावले. या डावात 18 धावांवर यष्टिचीत टाळल्यानंतर त्याने चतुरस्त्र खेळी खेळली आणि शेवटपर्यंत 125 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीनंतर जगभरातून त्याचं कौतुक झालं.

त्याचवेळी पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक रशीद लतीफने त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याच्याबद्दल एक विधान केले. त्याने पंतवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तो म्हणाला की, त्याला आत्मविश्वास नाही, तो क्रीजवर गेला तर चांगली खेली करेल किंवा लवकर आऊट होईल.

‘चल गये तो चाँद तक, नही चले तो शाम तक’ अशा पद्धतीने तो खेळतो. रशीद लतीफने आपल्या यूट्यूब चॅनलवर पंतबाबत हे वक्तव्य केले आहे. मात्र, हे खरे आहे की, पंत अनेक प्रसंगी आक्रमक खेळीच्या नादात विकेट गमावून बसतो. हे काही काळापासून दिसून येत आहे. त्याच वेळी, तो अनेक प्रसंगी निर्भयपणे खेळतो आणि 100-50 धावा देखील करतो.

त्यामुळे अशा रीतीने त्यांना कधी काय करावे हेच कळत नाही. भारतातील त्याच्या अनेक सहकारी क्रिकेटपटूंनीही हे मान्य केले आहे की ऋषभ पंत जेव्हा खेळतो तेव्हा तो गोलंदाजाला नव्हे तर स्वतालाच घाबरतो. मँचेस्टर वनडेनंतर मोहम्मद शमीनेही असेच विधान केले होते.

त्याच बरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील पंतच्या आक्रमक फलंदाजीवर अनेकदा बोलले आहेत, ते म्हणाले की पंतने आपली शैली कधीही सोडू नये पण हो परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही ही क्षमता दाखवली होती.

महत्वाच्या बातम्या
..तर फक्त १२ रूपये लीटरने पेट्रोल मिळणार; बड्या उद्योगपतीने सांगीतली भन्नाट आयडीया
‘ही’ व्यक्ती ठरवणार कोणती शिवसेना खरी अन् कोणती खोटी; उज्वल निकमांची महत्वपुर्ण माहिती
लाखो रुपये घेतले पण ‘ते’ कामच केलं नाही, अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी, होणार अटक?
शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच; ठाकरे समर्थक कल्याण शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now