Share

आता तुम्हीच ठरवा की मी.., ऋषभ पंतने आपल्या कर्णधारपदाबाबत केले हैराण करणारे वक्तव्य

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अंतिम सामना पावसामुळे रद्द केला गेला. यानंतर चाहतेही चांगलेच संतापलेले दिसले. सर्वांनाच हा सामना पाहायचा होता. मालिका अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) संघ आणि त्याच्या कर्णधारपदाबाबत महत्त्वाचे विधान केले.(Rishabh Pant, Chinnaswamy Stadium, Captain, Social Media)

टीम इंडियाने पहिले दोन सामने गमावले. यानंतर पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले. या मालिकेत पंतच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले होते. पहिल्या दोन सामन्यात पंतने काही चुकीचे निर्णय घेतले. चार सामन्यांत पंतच्या बॅटला चांगली धावसंख्या करता आली नाही. तसेच परत परत तोच शॉट खेळत तो बाद झाला.

सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांची खिल्लीही उडवली. असे वाटत होते की, त्याला कर्णधारपदाचे दडपण जाणवत होते. या मालिकेत काही चांगल्या गोष्टीही पाहायला मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकने IPL २०२२ चा फॉर्म कायम ठेवला. युझवेंद्र चहल, आवेश खान आणि हर्षल पटेल यांनीही चांगली गोलंदाजी केली.

मालिका संपल्यानंतर पंत म्हणाला, या मालिकेत आम्हाला अनेक सकारात्मक विजय मिळाले. संघाने मागे पडूनही चांगली कामगिरी केली आणि ती आमच्यासाठी चांगली गोष्ट होती. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून मी माझे १०० टक्के देण्याचा विचार करू शकतो. आता तुम्हीच ठरवायचे आहे की मी एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो.

पंत पुढे म्हणाला, माझे लक्ष नेहमीच मैदानावर चांगली कामगिरी करण्यावर असते. माझ्याकडून झालेल्या चुका सुधारत राहीन. नाणेफेक जिंकण माझ्या हातात नाही. आता मी इंग्लंड दौऱ्याचा विचार करत आहे. मी खूप उत्सुक आहे आणि मी शक्य तितके योगदान देण्याचा प्रयत्न करेन.

महत्वाच्या बातम्या-
तिसरा सामना जिंकूनही खूपच नाराज नाराज आहे ऋषभ पंत; धक्कादायक कारण आले समोर
सलग दुसऱ्या पराभवनंतर कर्णधार ऋषभ पंत झाला लालबुंद, या खेळाडूंवर काढला सगळा राग
VIDEO: हा तर रडीचा डाव; रबाडाने ऋषभ पंतला मारला कोपर, रस्ताही अडवला, कोसळला पंत
मोठी बातमी! महागड्या घडाळ्यांचे आमिष दाखवून या क्रिकेटरने ऋषभ पंतला लावला १.६३ कोटींचा चुना

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now